शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजू कारेमोरे यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:04 IST

Bhandara : चरण वाघमारे यांच्याकडून याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभा निवडणुकी संबंधात चर्चा सुरू असताना तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राजू कारेमोरे यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. यावर काय निर्णय लागणार, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

२०२०-२०२१ ला राजू कारेमोरे हे आमदार असताना स्वतःच्या आरके राईस उद्योग नावाने धान भरडाई करून तांदूळ पुरवठा करण्याचा कंत्राट त्यांनी घेतले. त्यावर मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि राज्यसरकारच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

त्याचा आधार घेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले होते. या प्रकरणी निवडणुकीपूर्वी निर्णय दिला असता, तर कारेमोरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पात्र ठरले नसते, असे याचिकेत म्हटले आहे. 

कारेमोरे यांच्या निवडीला उच्च न्यायालय नागपूर येथे आव्हान देणारी ही याचिका चरण वाघमारे यांच्या वतीने अॅड. अनिरुद्ध चांदेकर, संदीप सिंह, ऋषिकेश मैडीलवर व किशोरी डोंगरवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

अनेक मुद्यांचा याचिकेत समावेश निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर आरोग्य शिबिराचे विना परवानगी आयोजन करणे, महाप्रसादाचे आयोजन करणे, किटचे वाटप करणे, पैसे वाटप करणे, या आरोपाचे तुमसर, आंधळगाव, मोहडी, सिहोरा या पोलिस ठाण्यात आचारसंहिता उलंघनप्रकरणी ११ गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असताना, गोपनीयतेचा भंग करून तक्रारकर्त्याचे नाव उघड करणे, त्यावर निवडणूक आयोगाने कुठलीही कार्यवाही न करणे, मतमोजणीनंतर ५ बूथच्या व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी नियमानुसार शुल्क भरूनही मोजणी न करणे, जिल्हाधिकारी यांना सीसीटीव्ही व व्हिडीओग्राफी पुरविण्याची मागणी करूनसुद्धा न पुरविणे इत्यादी मुद्द्यांचा या याचिकेत समावेश करण्यात आला आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराvidhan sabhaविधानसभा