शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पडलेल्या धानाला दिली उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड : शासनाने त्वरित मदत करण्याची बळीराजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसासरा : परतीच्या पावसासह झालेल्या वादळाने सासरा व परिसरातील धानपीक पडले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कित्येकांचे धान पीक सडायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पाने गुंडाळणारी अडी व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पीक वाचवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी वाटेल ते उपाय करायला सुरुवात केली आहे. काहींनी भरमसाठ औषधांची फवारणी केली. मात्र यश मिळाले नाही. निसर्गाच्या अपकृपेने तोंडातील घास हिरावून घेण्याची परिस्थिती निमार्ण झाल्याने शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले असून आहे.वारंवार उद्भवणाऱ्या संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यातून सावरण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. हिम्मत हारलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही.आपण लढलेच पाहिजे. स्वस्थ बसलो तर आपल्या पदरात निराशाशिवाय काहीच पडणार नाही. हातातून पीक निसटेल. यासाठी शेतकऱ्यांच्या मनात एक युक्ती सुचली.काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.प्रतिनिधीने या शेतकऱ्यांची भेट घेतली असता या प्रयोगाने नुकसान टळल्याचे दिसून आले. या प्रयोगाने खर्च जरी वाढला असला तरी सडणारे धानपीक वाचवता आले. आम्ही असा प्रयोग केल्याने आमच्या हाती थोड्याफार प्रमाणात तरी धान्य पडेल. शेतीत झालेला खर्च तरी काढता येईल असे काहींनी सांगितले. काहीच उपाय केला नसता तर आमच्या पदरात तणीसच पडले असते, अशा संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.संकटांचा सामना करताना बळीराजा हतबलयावर्षी बळीराजावर सातत्याने संकटे सुरु आहेत. पूरात सावरत नाही. तोच परतीच्या पावसाने अनेक शेतातील धानपिक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातही काही शेतकऱ्यांनी आपले पिक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. एकीकडे पीक वाचवण्याची कसरत तर दुसरी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे बळीराजा त्रासला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी होत आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांची या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दया येत नसेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.माझ्या शेतातील धान पडला होता. त्याच्यावर पाणी तरंगत होते. याला उभे करुन वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहीना काहीतरी धान्य मिळेल अन्यथा हे धान पीक सडेल. कोणत्याही परिस्थितीत या निसाडा झालेल्या धानाची लोंबी बाहेर काढण्याची गरज होती. महिला मजूर कामाला लावून धान पीक उभे करुन त्यांच्या जुड्या बांधल्या. सध्या तरी मी केलेला प्रयोगाने मजूरीचा खर्च वाढला पण सडून पूर्णत: नष्ट होणाऱ्या पिकाला थोड्याफार प्रमाणात वाचवण्याचे समाधान मिळाले.-खुशाल सोनटके, शेतकरी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती