पावसाचा कहर : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारच्या रात्री पावसाने कहर केला. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. वेधशाळेने येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ७१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. लाखनी, लाखांदूर, साकोली व पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. साकोली तालुक्यातील सिलेझरी-ऐरंडीमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. शेतांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.
पावसाचा कहर :
By admin | Updated: September 18, 2015 00:35 IST