शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धानपोती ओली : खरेदी केंद्रांवर सुविधांचा अभाव, भाजीपाला पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांच्या रजेनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रांवर ओली झाली. सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशीही बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे प्रती क्विंटल २५१० रुपये धानाला भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली धानपोतींवर आच्छादन घालण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. एवढे करूनही धानपोती ओल्या झाल्या. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळून प्रतीक्विंटल २५१० रुपये भाव मिळत असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली. खरेदी केंद्राकडे घेऊन जाणारे धानही ओले झाले. याशिवाय तुमसर, मोहाडी, जांब, लोहारा, बारव्हा, नाकाडोंगरी परिसर, मासळ, आंधळगाव, जवाहरनगर, पवनी, लाखनी शहर व साकोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसला. अचानकपणे आलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारावरही परिणाम झालाहुडहुडी वाढलीमागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आधीच धुक्यामुळे थंडीत वाढ झाली असताना बरसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाने थर्टीफस्टच्या नियोजनावरही पाणी फेरले आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली असून बाजारपेठेत शॉल, स्वेटर, मफलर व दुपट्टे विक्रीसाठी गर्दी होत असल्याचे दृष्य आहे.

टॅग्स :Rainपाऊस