शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:58 IST

शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊणतास पाऊस बरसला. ग्रामीण परिसरात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवातावरणात गारवा। झाडे, टिनपत्रे उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊणतास पाऊस बरसला. ग्रामीण परिसरात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. शुक्रवार व शनिवारी पावसाने तुमसर तालुक्यात दमदार हजेरी लावली.शनिवारी दुपारपासून आकाश ढगाळलेला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वारा सुरु झाला. ५.२५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या. वाºयाचा वेग मोठा होता. त्यामुळे अनेक कौलारु घरांची पडझड झाली. टीन उडाले. झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.मागील दोन महिन्यापासून अंगाची लाही लाही करणारी उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सायंकाळी बारीक सरी कोसळत होत्या.सर्वात जास्त नुकसान ग्रामीण भागात झाल्याची माहिती आहे. रस्त्याशेजारील झाडे पडल्याची माहिती आहे. वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान मुसळधार पावसामुळे धरणी शांत झाली. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शेतकरीही आता मशागतीच्या कामाला लागला.वीज कोसळून शेतकरी ठारमोहाडी : तालुक्यातील महालगाव शेतशिवारात अंगावर वीज कोसळल्याने ४२ वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. रंगलाल ढबाले असे मृताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला. याचवेळी रंगलालच्या अंगावर वीज कोसळली. त्यांची पत्नी ही अन्य बाजूला असल्याने ती थोडक्यात बचावली. घटनेची माहिती पोलीस तथा महसूल प्रशासनाला देण्यात आली. तपास मोहाडीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम करीत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस