शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मऱ्हेगाव येथे अतिवृष्टीने घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:45 IST

दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे.

ठळक मुद्देसंसार उघड्यावर : मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे.लाखनी तालुक्यात गत आठवड्यात दमदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहे. अशातच गरीबाच्या मोडक्या तोडक्या घरांची अक्षरश: पडझड झाली. अशीच घटना मºहेगाव (जुना) येथे घडली. शेजारी राहणारे कुटुंबीय रहेले यांच्या संकटात मदतीला धावले. अचानक आलेल्या आपत्तीने रहेले यांचा संसार उघड्यावर आला आहे. तात्पुरती अत्यावश्यक मदत देण्यात आली. मात्र प्रशासकीय चमू शनिवारी व रविवारीही आली नाही.घरकुलाची अपेक्षारहेले दाम्पत्य नैसर्गिक संकटाने बेघर झाले. त्यांच्या नावाची ग्रामपंचायतीच्या यादीत घरकुल यादीत ‘ड’ मध्ये नाव नोंद आहे. या यादीला न्याय मिळणे सध्यातरी कठीण आहे. २०११ च्या चुकीच्या सर्वेनुसार गरजु लाभार्थ्यांचे नावच समाविष्ट नव्हते. याची तक्रार माजी सरपंच रामाजी बेंदवार यांनी जिल्हाधिकारी व बीडीओ यांना केली होती.मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने गरीबाची वाट लागली. त्याचा प्रत्यय मºहेगावात आले. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीला अश्या समस्याला सामारे जावे लागत आहे. महसूल प्रशासनाने रहेले परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच देवकन बेंदवार यांनी केले.