शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. प्रकरणी महसूल व खनिकर्म विभाग डोळे झाकून असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता नदीपात्रातून रेतीचा उपसा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने त्याचा फायदा रेतीतस्कर उचलत आहेत. करडी परिसरसह साकोली, लाखनी व लाखांदूरात रेतीचा अवैध व्यवसाय पुन्हा फोफावत आहे.करडी (पालोरा) : बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. प्रकरणी महसूल व खनिकर्म विभाग डोळे झाकून असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. पालोरा ते बोरगाव मार्गावर बोरगाव स्मशानभूमीच्या जागेत अवैध रेती विक्रीचे डम्पिंग यार्ड तयार केला जात आहे. अवैधरीत्या ट्रॅक्टरद्वारे रेतीचे उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास वर्दळ वाढल्याने अपघाताची शक्यता आहे. रेती भरून ट्रक व ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असल्याने, रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, परंतु बांधकाम विभाग या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या डम्पिंग यार्डची पूर्ण माहिती आहे. नव्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या पाठबळाने व साठगाठीतून ठिय्या तयार झाल्याचे सांगितले जात आहे. यासाठी रेती तस्करांकडून देवाण-घेवाण झालेली असल्याने त्यांनी या रस्त्याने न जाण्याची शपथ घेतल्याचे बोलले जाते. परिणामी, महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याकडून कारवाई केली जात नसल्याने, खुलेआम रेती तस्करीचा गोरखधंदा दिमाखात सुरू आहे. महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय? त्या रेती तस्कराचा शोध घेऊन कारवाई करणार काय, याकडे बोरगाववासीयांचे लक्ष लागले आहे.

परसोडी, गोंडउमरी घाटावर रेतीची वाहतूकगोंडउमरी : साकोली तालुक्यातील परसोडी, गोंडउमरी, महालगाव  व पळसगावमधील पवारटोली या घाटावरून ट्रॅक्टर व इतर वाहनाने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असून,  ११ वाजेपासून रेतीची वाहतूक केली जात आहे. याकडे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक घाटावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ये-जा करण्यासाठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने कारवाई करून रेती माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. मागील चार वर्षांपासून या मार्गावर बैलगाडीच्या साह्याने कोट्यवधी रुपयांच्या रेतीची चोरी करण्यात आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सातत्याने होत आहे.

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया