शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

दुष्काळ घोषित करण्यासाठी निवेदनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:15 IST

पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे पेरणीसह रोवणी देखील मातीमोल झाली आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषीत करावा, या मागणीसाठी दररोज निवेदनांचा पाऊस पाडला जात आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : शेतकरी अडचणीत, पेरणी, रोवणी करपली, मिळेल त्या साधनाने पीक वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे पेरणीसह रोवणी देखील मातीमोल झाली आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषीत करावा, या मागणीसाठी दररोज निवेदनांचा पाऊस पाडला जात आहे. शासन, प्रशासनाने परिस्थितीची जाणीव लक्षात घेवून दुष्काळग्रस्त जिल्हा घोषीत करण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.सिल्ली येथे टँकरने दिले पºह्यांना पाणीसिल्ली : पावसाच्या दांडीमुळे भंडारा तालुक्यासह जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांचे धानाची पºहे सुकले. काही सुकण्याच्या मार्गावर आहेत, तर उर्वरित कसेबसे जगविण्याचा आटापिटा सुरू असल्याचेच चित्र आहे.याच पार्श्वभुमीवर भंडारा तालुक्यातील सिल्ली (आंबाडी) येथील रहिवाशी संतोष वंजारी यांनी पºह्यांना वाचविण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने टँकमधून पाणी नेवून करपलेल्या पºह्यांना पाणी देवून वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न केला. यावेळी गावातीलच अंकुर मेश्राम व प्रमोद बावनकुळे यांनी सुध्दा पºह्यांना पाणी देण्यास वंजारी यांना मदत केली. रोवणी केली तरी हाती पीक येईपर्यंत धान पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. अडचणीच्या वेळी पिकाला जीवदान देणारे पाणी प्रकल्पातून अथवा तलावातून मिळेल काय? अशा एक ना अनेक विचारांनी शेतकरी प्रचंड तणावात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची दडी, पावसाने उशिरा हजेरी लावणे, हे नवीन नाही.जांब येथे करपलेले पीक वाचविण्यासाठी धडपडजांब (लोहारा) : पाऊस पडत नसल्याने व तापमान वाढल्याने धान पºहे जळुन राख होत आहेत. धानाचे पºहे वाचविण्यासाठी काही शेतकरी टँकरने पाणी देऊन पºहे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी आहे.ओबीसी छावा संग्राम परिषद, भंडारा व पवनीपवनी : भंडारा जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भातपिकासाठी टाकलेले पºहे वाळलेले आहेत. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.हंगामाला उशीर झाल्याने दुबार पेरणी करून शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्या शेतकºयांना २४ तास विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनस्तरावर शेतकºयांच्या पिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले नाही. शेतीचे सर्वेक्षण करून जिल्हा दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी ओबीसी छावा संग्राम परिषद भंडारा व पवनी तालुका यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष आजबले, भंडारा जिल्हा महामंत्री बालू ठवकर, पवनी तालुका महामंत्री मेघराज जोगवे (जवान), पवनी शहराध्यक्ष अमोल लांजेवार, अमोल जीभंकाटे, लोकेश तलवारे, दिनेश हटवार, संतोष राऊत, राज शिरसागर, शुभम देशमुख, सौरभ जीभकाटे, दिलीप शेंडे, अतुल भुरे, संजय साळवे, भिक्षूक वंजारी, मंथन गेडाम, पांडुरंग चौके, स्वप्निल तिघरे, अल्ताफ पटेल, आकाश हटवार, छावा संग्राम परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस, लाखनीलाखनी : सततच्या अस्मानी संकटामुळे शेतकºयांची अवस्था अत्यंत दयनीय व हलाखीची झालेली आहे. तसेच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अक्षरश: पºहे करपलेली आहेत. लावलेल्या पºह्यांना जगवण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशाही अवस्थेत लाखनी तालुक्यात केवळ १० टक्के रोवणी झाली आहे. संपूर्ण लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. तसेच सततच्या नापिकी व दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी सावकारांच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात शेतकरी आत्महत्येत प्रचंड वाढ झालेली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांनी टोकाची भूमिका घेण्याच्या आधी शेतकºयांची सरसकट कर्ज माफी करून तात्काळ सातबारा कोरा करण्यात यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. शेतकºयांची सरसकट कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, कृषी भारनियमन बंद करून २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी, धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा व राज्य शासनाने ५०० रूपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, तसेच स्वामिनाथन आयोगानुसार हमी भाव देण्यात यावा, शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, रोजगार हमी योजनेतून शेतीची कामे करण्यात यावी, पालांदूर येथील बायपास रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून संबंधित शेतकºयांना अविलंब मोबदला देण्यात यावा, नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी पालांदूर परिसरात सोडण्यात यावा, अशा मागणींचे निवेदन जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचेमार्फत देण्यात आले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, शहर अध्यक्ष धनू व्यास, जेष्ठ नेते दामाजी खंडाईत, नागेश पाटील वाघाये, माया अंबुले, नितीन निर्वाण, नरेश ईलमकर, अजय पुडके, अर्चना ढेंगे, चंद्रकला बडोले, सुनीता खेडीकर, नूतन मेंढे, शशिकांत भोयर, राजेश शिवणकर, राजकुमार अंबुले, गोपाल साठवणे, मुरलीधर भदाडे, राजेंद्र मेश्राम, विवेक गिºहेपुंजे, मोरेश्वर दोनोडे, कैलास वरकडे, आशिफ खान पठाण, पंकज खंडाईत, राजेश देशमुख, चेतन निर्वाण, अमोल गभने, विजय चाचेरे, आकाश गहरवार, राजन तितिरमारे, संदीप गिºहेपुंजे, रमेश मेश्राम, नोगेश मोहनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती