शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:27 IST

गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी निष्प्रभ : उच्चप्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सततच्या पावसाचा फुलोºयावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनात घट येण्यावर होणार आहे.दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणामा किडींवर होत नाही. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यापरिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करून धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरूवात झाली. शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसू लागले. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभावधानपिकावर किडींचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवारावे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करताना साकोली तालुक्यात दिसत नाही.

टॅग्स :agricultureशेती