शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

रेल्वे प्रशासनाने केला ग्रामस्थांचा रस्ता उद्ध्वस्त

By admin | Updated: December 29, 2016 02:01 IST

गोबरवाही ते हेटी दरम्यान सुमारे ३०० नागरिकांचा कच्चा रस्ता रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केला.

हेटी येथील प्रकार : आदिवासी बांधवांचा रेल्वे रोकोचा इशारा तुमसर : गोबरवाही ते हेटी दरम्यान सुमारे ३०० नागरिकांचा कच्चा रस्ता रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केला. यामुळे हेटी ग्रामस्थांना सुमारे तीन कि.मी. फिरून जावे लागत आहे. शेतीवर जाता येत नाही. याविरोधात हेटी ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. तुमसर - तिरोडी रेल्वे मार्ग ब्रिटीशकालीन आहे. गोबरवाही रेल्वेस्थानक ते हेटी गावादरम्यान रेल्वे ट्रॅक आहे. पुढे हा रेल्वे ट्रॅक डोंगरीकडे जातो. सुमारे ३०० आदिवासी लोकांची ही वस्ती आहे. रेल्वे ट्रॅक वर कच्चा रपटा मार्ग तयार केला होता. येथूनच ग्रामस्थ गोबरवाही व आपल्या शेतीवर अनेक वर्षापासून ये जा करीत होते. परंतु रेल्वे प्रशासनाने १५ दिवसापूर्वी हा रस्ता उध्वस्त केला. यामुळे ग्रामस्थांत प्रचंड असंतोष व्याप्त आहे. ग्रामस्थांना सध्या गोबरवाही गावातून ये जा करावी लागत आहे. शेतीवर जाताना सुमारे तीन कि.मी. लांबचा रस्ता पार करावा लागतो अशी तक्रार हेटी ग्रामस्थांनी केली. याच्या विरोधात रेल्वे रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. रस्ता उध्वस्त करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेण्यात आली असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. बांधकाम विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य शासनाने विविध विभागांची परवानगीनंतरच रस्ता बंद करण्यात आला असे रेल्वे प्रशासन सांगत आहे. तुमसर तिरोडी रेल्वे मार्गावर इलेक्ट्रॉनिक पॉइंट लावणे सुरु असून रेल्वे ट्रॅक नियमानुसार पार करता येत नाही असे स्पष्टीकरण येथे रेल्वे प्रशासनाने दिले. हेटी गावाचा रस्ता उध्वस्त करण्यापूर्वी ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची गरज होती. शासनाने ती परवानगी कशी दिली. वर्षानुवर्ष या रस्त्याचा उपयोग केला जात होता. शासन व प्रशासनाने लक्ष वेधून घेण्याकरिता रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्य संगीता सोनवाने, उपसरपंच दिलीप सोनवाने, गोबरवाहीचे सरपंच कृष्णकांत बघेल, दर्शन माधवानी, शरद खोब्रागडे, देवेंद्र अवथरे, घनश्याम मरस्कोल्हे, क्रांतीकुमार कोरचे, व्यंकट उईके यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)