शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी रेल रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 00:33 IST

अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा. वेगळा विदर्भ देता कि जाता असा सज्जड दम स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याकरीता ....

वामनराव चटप : ६ रोजी सेवाग्राम येथून एल्गारपवनी : अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा. वेगळा विदर्भ देता कि जाता असा सज्जड दम स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याकरीता व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ६ एप्रिलला दुपारी १२ वाजता वर्धा-सेवाग्राम रेल्वे स्थानक येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात विदर्भवादी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप यांनी पवनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.१ एप्रिल रोजी मच्छीमार सोसायटीच्या प्रांगणात विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात आंदोलनाविषयी माहिती देताना ते बोलत होते. पत्रपरिषदेत माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, प्राचार्य जगनाके, नेवारे, प्रकाश पचारे, सुनंदा मुंडले, डॉ. विक्रम राखडे, सुरेश अवसरे, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, राजेश येलशेट्टीवार, प्रवीण भोंडे उपस्थित होते.विदर्भाचे दोन अर्थसंकल्प श्रीनिवास खांदेवाले यांनी मांडले आहे. विदर्भाचे सगळ्या मार्गाचे २००५-०६ मध्ये उत्पन्न ४१,५६० कोटी रुपये होते खर्च ४१,४०० कोटी होता. नवीन कर न लावताही विदर्भाचा अर्थसंकल्प ११० कोटींनी शिलकीचा होता. विजेचे दर २० टक्के कमी केले व एकाही पैशाचा कर लावला नाही तरी विदर्भाचा अर्थसंकल्प १३,००० कोटींनी वाढला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ५४,४०० कोटीचा असून खर्च ५२,३८० कोटी आहे १,६६० कोटीचे शिलकीचे अंदाजपत्रक आहे. दोन्ही अर्थसंकल्पाला आजपर्यंत कोणीही आव्हान दिले नाही. आज महाराष्ट्रावर ४ लाख १३ हजार कोटीचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत त्या थांबवणे व शेतमालाला हमी भाव देणे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवणे, विजेचे लोडशेडिंग, निम्मे दरात वीज देणे, बचत गटावरील मायक्रोफायनान्सच्या कर्जमुक्तीसारख्या सर्वसमस्यांचे उत्तर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हेच असून विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन दिल्ली, मुंबई, कालकाताकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या थांबवून रेल रोको आंदोलन यशस्वी करावे. सेवाग्राम स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे ठिकाण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे याकरीता या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन अ‍ॅड. चटप यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)