शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रॅक पॉर्इंटअभावी माल वाहतुकीत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:27 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकºयांसह व्यापाºयांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.भंडारा शहर राष्ट्रीय महामहामार्ग आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे. भंडारा शहरापासून १० कि़मी. अंतरावर वरठी रोड येथे प्रवासी रेल्वे स्थानक आहेत. तसेच काही वर्षांपुर्वी शहरात सुद्धा रेल्वे येत होती. आयुध निर्माणीसाठी ही रेल्वे भंडारा शहरातून जात होती. परंतु आता ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. भंडारा शहर ते भंडारा रोड अशी शटल रेल्वे सुरू करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासून आहे. या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा येथे रॅक पॉर्इंट सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आहे. भंडारा शहरात रेल्वेची ६५ एकर जागा आहे. या रॅक पॉर्इंटसाठी रेल्वेच्या वतीने दोन-तीनदा पाहणी करण्यात आली. परंतु अद्यापर्यंत रॅक पॉर्इंटला मंजुरी दिली नाही.याठिकाणी रॅक पॉर्इंट मंजुर झाल्यास शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकरी आणि व्यापाºयांना माल वाहतुक सोईची होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रेमचंद डोरले, संतोष राजगीरे, सुनिल लेंडे व शेकडो नागरिकांनी निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वरठी येथे सुपरफास्टला थांबा द्याभंडारा या जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या वरठीरोड रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही तब्बत २२ सुफरफास्ट गाड्या थांबत नाही. याठिकाणी ज्ञानेश्वरी, हावडा-हापा, हावडा-पोरबंदर, बिलासपूर-पुणे, एलटीटी-भुवनेश्वर, पुरी-शिर्डी, पुरी-अजमेर आदी सुपरफास्ट रेल्वेंना थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वरठी रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.