शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

लायब्ररी चौकात दोन गटात ‘राडा’

By admin | Updated: December 22, 2016 00:44 IST

दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

निवडणुकीवरून पेटला वाद : हाणामारीत निघाल्या तलवारी, जखमी चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू, पोलीस कुमक तैनात भंडारा : दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांकडून तलवारी निघाल्या. या घटनेत दोन्ही गटातील प्रत्येकी दोन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायब्ररी चौकात घडली. सोमवारला नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात या निवडणुकीचीच चर्चा आहे. कुणाची मते कुणाला मिळाली किंवा मिळाली नाही, या कारणावरून मागील दोन दिवसांपासून या दोन्ही गटात धुसफूस सुरू आहे. या अंतर्गत कलहाचे रूपांतर आज मारहाणीत झाले. बुधवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका गटातील इसमाने दुसऱ्या गटाच्या इसमाशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर एकाने हात उगारला. त्यानंतर तलवारी निघाल्या. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. परिणामी या परिसरात खूप वेळ संघर्ष व तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कावरे रूग्णालय परिसर ते नगरपरिषद गांधी विद्यालयाच्या भागात सुमारे तासभर हा राडा सुरूच होता. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस ताफा वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला. परंतु पोलीस उशिरा आल्याचा आरोप होत होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लायब्ररी चौकातील फुटपाथसह मुख्य दुकानदारांना दुकाने बंद करायला लावली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण हे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. लायब्ररी चौकात जमलेला समुदाय पोष्ट आॅफीस चौक ते बसस्थानक मार्गावर असलेल्या एका कार्यालयाजवळ एकत्रित झाला. मतांच्या राजकारणावरून संबंधित गटाने मारहाण केली, असा आरोप करून दोषींविरूद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या एका गटाने लावून धरली. यावेळी पोलीस दलाची विशेष कुमक तैनात करण्यात आली होती. दुसरीकडे मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात तर उर्वरीत दोघांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नईमउद्दीन कमरुद्दीन शेख (५१) रा.बैरागीवाडा व आरिफ सलाम पटेल (३५) रा.अन्सारी वॉर्ड अशी जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या जखमींची नावे आहेत. दोघांचेही बयाण नायब तहसीलदार गावंडे व पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी नोंदविले आहेत. वृत्त लिहिपर्यंत शहर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध सारखेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, साहेबांना विचारा, असे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान बस स्थानकाजवळ एका गटाची सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती. दुपारच्या सत्रात घडलेल्या या हाणामारीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा होती. (प्रतिनिधी) कायदा व सुव्यवस्था ढासळली तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या स्थांनातरणानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णत: ढासळली आहे. मागील वर्षभरापासून शहरात गांजा, चरस आणि अवैध धंदे वाढले आहेत. आयपीएलसारखे जुगार सट्टा व जुगारात परावर्तित करण्यात येत आहेत. सहा महिन्यापूर्वी एका आयपीएलच्या अड्डयावर धाड घालण्यात आल्यानंतर किती रक्कम सापडली याचा अद्याप उलगडा झाला नाही. त्या आरोपींना कोणती शिक्षा झाली, हे सुद्धा सांगण्यात आले नाही. एकंदरीत तुम्ही राजरोसपणे अवैैध धंदे सुरू करा, असा फतवा निघाल्यागत शहरात अवैध धंदे वाढले आहेत. दुपारच्या सुमारास पुन्हा तणाव दुपारी १२ वाजता संपलेला हा राडा पुन्हा चार वाजताच्या सुमारास एकमेकांसमोर आला. लायब्ररी चौक संवेदनशील गणल्या जाते. त्यामुळे या परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज आहे. परंतु जिल्हा पोलीस प्रशासनाला अशी पावले उचलावी कधी वाटली नाही. जे होत आहे ते पाहण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण हटविण्याची गरज नगर पालिकेत आता सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे आव्हान नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्यासमोर आहे. शहरातील अतिक्रमण मुक्त करून रस्त्यावर असलेली अतिक्रमित दुकाने हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.