शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : खरीपानंतर शेतकरी पुन्हा संकटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गत तीन दिवसांपासून तर सारखा अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते.जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, मुग उडीद, सोयाबीन, जवस पोपट, भाजीपाला, भूईमुग, ऊस, मसूर, मोहरी, मिरची आदी पिकांची लागवड करीत असतात.यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या आशेने शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला.तथापि जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकºयांनी भर दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.रबी पिके सुरुवातीला जोमात असताना शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन-तीनदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने रबी पिके संकटात सापडली आहेत.कृषी विभागाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षखरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात. रबी पिकांवर वातावरणाचा फटका बसत असून उत्पादनात कमालीची वाढ होण्याची शक्यताही कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपाययोजना शून्य असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.रात्रभर बरसला पाऊसभंडारा शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाऊस बरसत होता. दिवसभर ढगाळी वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली

टॅग्स :agricultureशेती