शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आरोग्य केंद्र स्थानांतरणाचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 5:00 AM

सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इमारतीत आरोग्य केंद्र स्थानांतरीत करण्यात आले नाही. यामुळे आजारी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही.

ठळक मुद्देचुल्हाड येथील प्रकार : समस्या सोडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नविन प्रशस्त इमारतीत जलद गतीने स्थानांतरीत करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन माजी सभापती धनेंद्र तुरकर यांच्या नेतृत्वात राज्याचे आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले. यामुळे स्थानांतरणाचा प्रश्न लवकर सोडविले जाण्याची शक्यता आहे.सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इमारतीत आरोग्य केंद्र स्थानांतरीत करण्यात आले नाही. यामुळे आजारी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही.नागरिक वाढत्या आजार व मृत्यूचे प्रमाण यामुळे भयभीत झाली आहे. आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रयत्न करीत आहे. जिल्हास्तरावर आरोग्य सेवेचा आढावा घेतला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गावात अशा सुविधा व सेवा नाहीत. यामुळे त्यांना रेफर करावे लागत आहे. आधीच शहरात असणारे रुग्णालय फुल्ल झाले आहेत. यामुळे त्यांना उपचार मिळत नाही. परिणामी त्यांना गावात परत न्या, याशिवाय पर्याय राहत नाही. यामुळे या परिसरात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.यावेळी राष्ट्रावादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, सरपंच मधु अडमाचे उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकारकोरोना संसर्ग व अन्य आजारात जलद गतीने वाढ होत असतांना आरोग्य सेवा अपुरी ठरत आहे. यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. चुल्हाडचा प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारतीत तात्काळ स्थानांतरीत करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते राष्टÑपाल ऊके यांनी हस्ताक्षर अभियान सुरु केले आहे. विभिन्न आजाराने नागरिक ग्रस्त असताना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत नाही. तांत्रिक अडचणी निकाली काढुन नविन इमारतीत आरोग्य सेवा सुरु करण्याचे निवेदनात नमुद आहे.विरोधकांचा शासनाला अल्टीमेटमआजारात रुग्ण संख्या वाढत असतांना चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारतीत सुरु करण्यात आले नाही. ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न केले जात नाही. इमारत तयार आहे. यंत्रणा कार्यरत आहे. ही वेळ उद्घाटनाची नाही. सेवा देण्याची आहे. परंतु तसे प्रयत्न होत नाही. सामाजिक कार्यकर्ते किशोर रहांगडाले यांनी शासनाला महिनाभराचा अल्टीमेटम दिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल