शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोहफूल संकलन करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगलात न जाण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय देऊन मोहफूल संकलनाचे काम करु द्यावे अशी संकल्पना पुढे येऊ लागली आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भीती : वनविभागाने सुरक्षित पर्याय द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील पवनी व अड्याळ वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोहफूलाची वृक्ष आहेत. मोहफूल संकलनासाठी गाव- खेड्यातील महिला पहाटेपासून जंगलाकडे धाव घेतात. मात्र आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्याने मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगलात न जाण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय देऊन मोहफूल संकलनाचे काम करु द्यावे अशी संकल्पना पुढे येऊ लागली आहे.मोहफूल संकलन सोयीचे व्हावे म्हणून नागरिक जंगलात मोहफूल वृक्षाखाली आग लावून पालापाचोळा जाळतात त्यामुळे जंगलात आग लागून वनसंपदा नष्ट होत असते. तसेच मोहफूल संकलनासाठी पहाटे जंगलात गेल्यास जीवाला धोका संभवतो. हे टाळण्यासाठी वनविभागाने उन्हाचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी हिरवी जाळी मोहफूलाची संकलन करणाºया महिलांना पुरविल्यास झाडाखाली विशिष्ट उंचीवर जाळी बांधून खाली जमिनीवर न वाकता सहजपणे मोहफूल संकलन करणे सोयीचे होईल.असे केल्यास पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावणे, पहाटे जंगलात जाऊन धोका पत्करणे व प्रसंगी जीव गमावून बसणे टळू शकते. वरिष्ठ अधिकारी सुरक्षित पर्याय देण्यासाठी विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक