शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात १ नाेव्हेंबर पासून आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. ७८ खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ७७ ठिकाणी खरेदी सुरु आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी, महापुराचा फटका झेलत शेतकऱ्यांच्या घरी धान आला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हमीभावासह बाेनस मिळत असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावरच धान विकत आहे. नाेंदणी करुन धानाची विक्री केली जात आहे.

ठळक मुद्दे११६ काेटींची चुकारे : गाेदाम हाऊसफुल, खरेदी प्रभावित, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पणन महासंघाच्यावतीने आधारभूत केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३ हजार ४६१ रुपये आहे. यापैकी ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपयांचे चुकारे  शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. आता ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे चुकाने बाकी आहेत.  जिल्ह्यातील बहुतांश गाेदाम हाऊसफुल झाले असून धान ठेवायलाही जागा नाही. परिणामी अनेक  ठिकाणी धान खरेदी प्रभावित झाली आहे.जिल्ह्यात १ नाेव्हेंबर पासून आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. ७८ खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ७७ ठिकाणी खरेदी सुरु आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी, महापुराचा फटका झेलत शेतकऱ्यांच्या घरी धान आला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हमीभावासह बाेनस मिळत असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावरच धान विकत आहे. नाेंदणी करुन धानाची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील ७७ केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यात भंडारा तालुका ७७ हजार ७९ क्विंटल, माेहाडी १ लाख ६२ हजार २९४ क्विंटल, तुमसर २ लाख ५ हजार ८६२ क्विंटल, लाखनी १ लाख ८० हजार ४३८ क्विंटल, साकाेली १ लाख ५५ हजार ४६७ क्विंटल, लाखांदूर २ लाख ९ हजार २४५ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ८९ हजार ४९४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधारभूत खरेदी केंद्रावर आतापर्यंत केवळ सर्वसाधारण प्रतीचा धान खरेदी करण्यात आला आहे. उच्चप्रतीचा धान अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याने येथे विक्रीसाठी आणला नाही. शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकलेल्या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३  हजार ४६१ रुपये आहे. ही रक्कम आधारभूत दरानुसार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपये वळते करण्यात आले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना धानाच्या पैशाने माेठा आधार दिला आहे. उर्वरित ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेले बहुतांश गाेदाम फुल्ल झाले आहे. धान ठेवायलाही जागा नाही. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झाली आहे. मिल मालकांना तात्काळ भरडाईचे आदेश देवून गाेदाम खाली करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

परप्रांतातील धानाला बंदी महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा धानाला बाेनससह अधिक रक्कम मिळते. १८६८ रुपये हमीदर आणि ७०० रुपये बाेनस असे २५६८ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगढच नव्हे तर बिहार राज्यातून माेठ्या प्रमाणात जिल्ह्यात धान विक्रीसाठी येत हाेता. अनेक व्यापारी कमी किमतीत धान खरेदी करुन महाराष्ट्रातील आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांच्या  नावाने विकत हाेते. हा प्रकार उघडकीस आला. चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतातून धानाला बंदी घालून सर्वसीमा सील केल्या. हा प्रकार शाेधून काढण्यासाठी पथकाचे गठण करण्यात आले आहे. केवळ राज्यातील शेतकऱ्यांचाच धान खरेदी केला जावा, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड