शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

उन्हाळी धान खरेदीचे चुकारे अडले

By admin | Updated: July 2, 2015 00:43 IST

शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली.

शेतकरी आर्थिक संकटात : ३.७१ कोटीची थकबाकीअशोक पारधी पवनीशासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली. परंतु महिना लोटल्यानंतरही उन्हाळी धान खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे खरीप पिकाचे पेरणीसाठी लागणारा खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.पवनी तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून शेतकी खरेदी विक्री सहकारी संघाचे वतीने चार केंद्रावर ७०५ शेतकऱ्यांकडून २७३१४.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धानाची खरेदी रक्कम ३ कोटी ७१ लक्ष ४७ हजार ८५६ शासनाकडून देण्यात आलेली नाही. खरेदी विक्री संस्थेने त्यांच्या लिमीटमधून आतापर्यंत १ कोटी १० लक्ष रु. शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान्स पेमेंट केलेला आहे. उर्वरीत रक्कम न मिळाल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील पवनी केंद्रावर ७९६९.२० क्विंटल, आसगाव केंद्रावर ९२२९.९० क्विंटल, कोंढा केंद्रावर ६९८१ क्विंटल तर अड्याळ केंद्रावर ३१३४.६० क्विंटल असे एकूण २७३१४.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. खरीप हंगामासाठी खर्च करता यावे यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना न विकता आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकलेले आहे. परंतु शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांनाच अडचणीत आणले आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना ग्रामीण भागात विचारला जात आहे.बोनसचा देखील पत्ता नाहीखरीप हंगामाचे धान आधारभूत केंद्रावर देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने बोनस देण्याची घोषणा केली. परंतु बोनसची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. धानाचे चुकारे व बोनस केव्हा मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.पावसाची हजेरीपालांदूर : सात दिवसाच्या विश्रांतीनंतर पालांदूर परिसरात पावसाने हजेरी लावली. पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली असून रोवणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदानानंतर रोवणीला गती येणार आहे. दुबारपेरणी संकट टळल्याने शेतकरी सुखावला आहे. सिंचनाखाली क्षेत्रात रोवणीस आरंभ झाला आहे.