शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:51 IST

उन्हाळी धान पिकाकरिता शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याकरिता शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. पंरतु शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता प्रथम शासनाचे धान खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देवांगी येथील प्रकार : वाहनी केंद्रात शेकडो धान पोती पडून

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : उन्हाळी धान पिकाकरिता शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याकरिता शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. पंरतु शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता प्रथम शासनाचे धान खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर तालुक्यातील वाहनी येथे शेतकऱ्यांची शेकडो धान पोती खरेदी केंद्रावर पडून असून वांगी येथे व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे तथा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून केली आहे.तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द आहे. सिहोरा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांची लुट होऊ नये व शासकीय दराप्रमाणे शेतकºयांना धानाचा भाव मिळावा याकरिता धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. सदर केंद्रावर शासकीय नियमानुसार शेतकऱ्यांकडे धान खरेदी करण्याचा कायदा आहे,परंतु वाहनी धान खरेदी केंद्रावर शेकडो धानाची पोती पडून असतांना त्यांची मोजणी करण्यात आली नाही. उलट वांगी येथे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान खरेदी करणे सुरु आहे.वाहनी केंद्रावर इलेक्ट्रानिक काट्याने धानाची मोजण्ीा होत नाही. तर साधा वजनमाप काट्यावर धानाची मोजणी केली जात आहे. त्यामुळे मोजणीत शेतकऱ्यांची लुट होत आहे. वाहनी धान खरेदी केंद्रावर शेतकºयांची आकस्मिक पाऊस आल्यास धान ओले होऊन नुकसान होऊ नये म्हणून धान पोती प्लास्टीकने झाकून ठेवली आहे.पावसाळ्याची चाहुल लागली असून वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता बळावली आहे. अशातच धान ओले झाले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी भंडारा येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्कसाधला असता त्यांचा फोन बंद होता, असे तक्रारीत नमुद केले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासणार की व्यापाऱ्यांचे हित जोपासणार आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी येथे उपस्थित केला आहे.वाहनी येथील धान खरेदी केंद्रावरील सुरु असलेला सावळागोंधळाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी नागपूर यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात वाहनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणे सुरु न केल्यास शेतकºयांसोबत आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य हिराला नागपूरे यांनी दिला आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र लुट केंद्र आहे काय? येथे शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता व्यापाºयांचे धान खरेदी करणे नियमबाह्यपणे सुरु आहे. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. असा अन्याय कदापी खपवून घेणार नाही.- हिरालाल नागपूरेपंचायत समिती सदस्य सिलेगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड