लोकमत न्यूज नेटवर्कगोंडउमरी : साकोली तालुक्यातील निलज येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेअंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासून त्यांच्याकडून धानाची खरेदी केली जात आहे.यात लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सावळागोंधळ सुरु असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला असून तहसीलदारांना निवेदन देऊन तक्रारसुद्धा केली आहे. शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी आधारभूत खरेदी केंद्र कार्यरत आहेत. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना बाजूला ठेवून व्यापाºयांना प्राधान्य दिले जात आहे. इकडून तिकडून गोळा केलेले सातबारा व्यापारी सादर करून टोकन मिळवून घेत आहेत.केंद्राजवळच राईस मिल असल्याने त्या ठिकाणावरून व्यापाºयांचे धान विक्रीसाठी आणले जाते. हा प्रकार काशिनाथ गहाणे यांच्या लक्षात आले. गटक्रमांक ७०९ आराजी ०.०५ हेक्टर आर वर्ग १ आकारणी असा तपशील असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर स्वत:चे नाव हाताने लिहून खोडतोड करण्यात आली. या प्रकरणी तलाठ्यांनी शहानिशा केली असता या प्रकारातील सत्य समोर आले. खोडतोड केलेल्या सातबाराच्या आधारावर टोकन प्राप्त करून आॅनलाईन रक्कम आपल्या खात्यात वळती केली. या सातबारावर गैरअर्जदाराचे मुळात नावच नसल्याचे दिसून आले.या प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. कोटनिलज येथे राजकारणापोटी उलटसुलट चर्चा करण्यात येते. आधारभूत केंद्रावर सावळागोंधळाची तक्रार प्राप्त झाली आहे. या संबंधी चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- अरविंद हिंगे,तहसीलदार, साकोली.
आधारभूत केंद्रावर होतेय व्यापाऱ्यांच्या धानाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:11 IST
साकोली तालुक्यातील निलज येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेअंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासून त्यांच्याकडून धानाची खरेदी केली जात आहे.
आधारभूत केंद्रावर होतेय व्यापाऱ्यांच्या धानाची खरेदी
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : निलज केंद्रावर सावळागोंधळ