धान खरेदीची अंतिम मुदत ३० जून होती. मात्र संपूर्ण धानाची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्र शासनाने धान खरेदीला मुदतवाढ दिली. राज्य शासनाने १५ जुलैपर्यंत धान खरेदीसाठी परवानगी दिली आहे. आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान आहे. शेवटच्या आठवड्यात बारदान्याअभावी धान खरेदी ठप्प झाली होती. आता संपूर्ण धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढ मिळते काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
तालुकानिहाय धान खरेदी
तालुका क्विंटल
भंडारा ७२००२
मोहाडी २४७४९८
तुमसर ३८८५५७
लाखनी १०६६२९
साकोली २०८६१४
लाखांदूर १८३७२४
पवनी ११२८२१
एकूण १३१९८४८
बॉक्स
शेतकऱ्यांना धान खरेदीला मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा
गोदामाअभावी धान खरेदी उशिरा सुरू झाली. त्यातच बारदान्याची टंचाईही निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान आधारभूत खरेदी केंद्रावर विकणे शक्य झाले नाही. धान खरेदीची अंतिम मुदत ३० जून होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीमुळे केंद्र सरकारने एक महिन्याची मुदतवाढ दिली. मात्र राज्य शासनाने १५ जुलैपर्यंतच धान खरेदीला परवानगी दिली. बारदान्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या घरात धान आहे. पणन खरेदी बंद केली तर व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतील. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत धान खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.