शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम

By admin | Updated: May 6, 2016 00:43 IST

पोलीस विभागामार्फत उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध शाळांना भेटी देऊन महिला पोलिसांनी जनजागृती मोहिम राबविली.

महिला पोलिसांचा उपक्रम: उपलब्ध सुविधांचा वापर करण्याचे आवाहनभंडारा : पोलीस विभागामार्फत उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध शाळांना भेटी देऊन महिला पोलिसांनी जनजागृती मोहिम राबविली. या मोहिमेला विद्यार्थींनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महिला सेल व दामिनी पथकाने महर्षी विद्या मंदिर बेला, रॉयल पब्लिक स्कुल, सेंट पिटर्स स्कुल बेला, सेंट मेरी स्कुल येथे भेटी दिल्यात. त्यांनी भंडारा पोलीस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नियंत्रण कक्ष भंडारा येथे उपलब्ध असलेले हेल्पलाईन क्रमांक (१०९१ व भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५८३११०० , ९४०५८४११००) या क्रमांकावर दुरध्वनीव्दारे किंवा व्हॉटसअ‍ॅपव्दारे तत्काळ माहिती देऊन जिल्ह्यातील महिला व मुलींनी मदतीची मागणी करुन तत्काळ मदत घ्यावी, असे आवाहन केले. भंडारा विभागामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकानातून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी महिलांसाठी दामिनी पथकाची नेमणूक केली. दामिनी पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी भंडारा, कारधा, वरठी, जवाहरनगर आदी ठिकाणी शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बगिचा, पर्यटनस्थळ आदी ठिकाणी दरदिवशी भेटी देत आहेत. महिलांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणावर आळा बसावा, यासाठी 'पेट्रोलिंग करीत आहेत. जिल्हा पोलीस दलातर्फे 'सिटीजन कॉप्स' व 'प्रतिसाद' या अ‍ॅपचे शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही अ‍ॅपव्दारे कुणीही महिला, पुरुष अडचणीत असल्यास त्यांनी या अ‍ॅपवरुन मदतीची मागणी केल्यास मदत देण्याची उपाययोजना केली असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महिला सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक एल.एन तोडासे म्हणाल्या, 'सिटीजन कॉप'मध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस अधिकाऱ्यांचे दुरध्वनी क्रमांकाची यादी उपलब्ध आहे. 'प्रतिसाद'मध्ये आॅनलाईन तक्रार नोंदविली जाते. व्हिडीओ, आॅडिओ, व छायाचित्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. काही महिला तक्रारदार सामाजिक, कौटूंबिक कारणावरुन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल वाढते, महिलांवरील अत्याचारात वाढ होते. पोलीस विभागातर्फे उपलब्ध सुविधांचा वापर करून पोलिसांना सहाकार्य करावे, असे आवाहन तोडासे यांनी केले आहे. मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.एन. तोडासे यांच्या नेतृत्वात महिला पोलीस कर्मचारी मंदा ठवरे, प्रिती हलामारे, शालु चंद्रिकापुरे, मंदा वाघमारे, शिल्पा शेंडे, रुपाली नेवारे, पुजा बावनकुळे, तृप्ती खोब्रागडे सहभागी झाल्या होत्या. (नगर प्रतिनिधी)