तेंदूपत्ता संकलनातून मजुरांना रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:00 AM2020-05-07T07:00:00+5:302020-05-07T07:00:06+5:30

भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सर्वात मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला त्वरीत मंजुरी देवून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Provide employment to laborers through tendupatta collection | तेंदूपत्ता संकलनातून मजुरांना रोजगार द्या

तेंदूपत्ता संकलनातून मजुरांना रोजगार द्या

Next
ठळक मुद्देवनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा : लॉकडाऊनमध्ये होईल मदत, आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूच्या संसर्गाची झळ भंडारा जिल्ह्यालाही बसली. केंद्र आणि राज्य शासनाने या आजाराचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. गेल्या दीड महिन्यापासून नागरिकांच्या हाताला काम नाही.परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सर्वात मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला त्वरीत मंजुरी देवून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात एक कोरोना बाधीत आढळला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य चाचण्या करण्यात येत आहेत. शासनाने भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये केला. या झोनमधील जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. गेल्या दीड महिन्यांपासून मजूर घरीच अडकले आहेत. हातात जो पैसे अडका होता, तो देखील संपला. आता त्यांच्यापुढे रोजगार आणि कुटुंबाच्या पालन पोषण करण्याचा प्रश्न निर्माण राहिला आहे.
एप्रिल ते मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो. जिल्ह्यातील बहुतांश भागात जंगल व्यात असल्याने त्याठिकाणी तेंदू संकलनातून नागरिक अर्थार्जन करतात. नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील जंगल व्याप्त भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला त्वरीत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री बडोले यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली. यावर त्वरीत तोडगा काढण्याचे आश्वासन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

मग्रारोहयोची कामांना गती द्या
ग्रामीण भागातील नागरिकांना मग्रारोहयोच्या कामांच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध होतो.मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मग्रारोहयोची कामे बंद होती. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मग्रारोहयो अंतर्गत तलाव खोलीकरण, घरकुल, नाला खोलीकरण, भातखाचर, रस्ते, पांदन आदी कामांना त्वरीत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Provide employment to laborers through tendupatta collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.