शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नागरी सुविधा द्या, नंतरच कर वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:51 IST

नजीकच्या कारधा येथील एकता नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरटॅक्स द्यायला नकार नाही, परंतु आधी नागरी सुविधा द्या नंतरच कर वसुली करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकारधा येथील प्रकार : रस्ते व नाल्यांची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नजीकच्या कारधा येथील एकता नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरटॅक्स द्यायला नकार नाही, परंतु आधी नागरी सुविधा द्या नंतरच कर वसुली करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.वाढत्या शहरीकरणासोबतच नागरिकरणाचाही व्याप वाढत आहे. त्याअंतर्गत लहान गावांचे विस्तारीकरणही झपाट्याने होत आहे. याला कारधा गावही अपवाद नाही. कारधा येथील एकता नगर भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी घरी बांधली आहेत. सद्यस्थितीत मार्च महिना असल्याने कारधा ग्रामपंचायतीतर्फे घरकर वसुली मोहीम जोमात सुरु आहे.दुसरीकडे एकता नगर येथील रहिवाशांना घरटॅक्सच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. घरकर व इतर कर शुल्क वसुलीबाबत पावती देण्यात येत आहे. सन २०१४ पासून प्रथम मोजणीनुसार सर्वांचे घरकर कमी होते. सन २०१५ मध्ये घरकर घेण्यात आले नाही. २०१६ मध्ये कराची मागणी न करता ती रक्कम थकीत ठेवून २०१७ - १८ व २०१९ पर्यंतचे एकमुस्त कराचा भरणा करणे येथील रहिवाशांना अशक्य झाले आहे. परिणामी घरकर डिमांडची रक्कम फुगली असून नागरिकांचे टेंशन वाढले आहे.विशेष म्हणजे एकता नगर वॉर्ड परिसरात नाली, रस्ते, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बोअरवेल नाही. मूलभूत सुविधांचा वानवा असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र इमाने इतबारे घरकराबाबत डिमांड करीत आहे.नागरिक सुविधा देण्यात अयशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला घरकर का द्यावे असा प्रश्नही येथील नागरिकांनी विचारला आहे. विशेष म्हणजे घरकराची डिमांड पाठविताना त्यावर सही, शिक्का तसेच पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरीही नाही.पावसाळ्याच्या दिवसात नाल्याअभावी घराच्या सभोवताल पाणी साचत असते. कच्चे रस्ते असल्याने रहदारीला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणीही एकता नगरवासीयांनी केली आहे.