शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:30 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’: ७ फेबु्रवारीपर्यंत प्रस्तावांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरु केला आहे.गतवर्षी अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ प्रत्येक कॅटेगरीबाबतचे निकष अर्जामध्ये नमूद केलेले असून, अधिक माहितीसाठी भंडारा लोकमत कार्यालयाच्या ०७१८४-२५२६३१ या क्रमांकावर संपर्क साधावा़अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.मागील वर्षी ज्या सरपंचांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना या वर्षी त्याच कॅटेगरीमध्ये प्रस्ताव दाखल करता येणार नाही़पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन / ई-प्रशासन / लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.‘लोकमत’ पुरस्कार ही सरपंचांसाठी मोठी संधीग्रामविकासाला चालना देण्यात ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची महत्वपूर्ण भूमिका आहे़ गेल्या वर्षी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला़ चांगली कामे करणाऱ्या गावांचा मोठा सन्मान झाला़ त्यामुळे अनेक गावांना यातून प्रेरणा मिळत आहे़ चांगले काम करणाºया सरपंचांसाठी हा पुरस्कार मोठी संधी आहे़ सरपंचांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे जे काम सरकारकडून होणं अपेक्षित होतं, ते ‘लोकमत’ने हाती घेतले आहे़ -योगिता गायकवाड, नागपूर,मागील वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या़