शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात बायो इथेनॉलचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:20 IST

धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

फुके यांचा पुढाकार : मुखमंत्र्यांचा पेट्रोलियम मंत्र्यांकडे पाठपुरावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. धानाला भाव नाही, मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना धानपिकानंतर निघणारे तणस चाऱ्यासाठी तर कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. अशा स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यातून उद्योग निर्माण करता यावा, यासाठी भंडारा जिल्ह्यात बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.तणसापासून बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत देशात ११ ठिकाणी बायो-ईथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सुमारे ५०० ते ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत आयओसीएलचा पानीपत (हरीयाणा), दहेज (गुजरात), बीपीसीएलचा बारगढ (पंजाब), कोची (केरळ) आणि एचपीसीएलचा भटिंडा (पंजाब) अशा पाच ठिकाणी सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात असा प्रकल्प झाला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी मदत होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ५० एकर जागा अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रीक टन जैविक खत तयार होऊ शकते असा हा प्रकल्प राहणार आहे.मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत अत्यल्प पाऊस बरसला आहे. मागीलवर्षी २२ जुलैला ४५८.७ मि.मी. पाऊस बरसला होता यावर्षी ३८१.६ मि.मी. ईतकाच पाऊस बरसला आहे. आतापर्यंत ५० ते ६० टक्के रोवणी अपेक्षित असताना यावर्षी केवळ कृषीपंप धारक शेतकऱ्यांचीच रोवणी आटोपली आहे. याची टक्केवारी २५ ते ३० ईतकी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत शेतीवर आधारीत उद्योग भंडारा जिल्ह्यात झाला तर असा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.शेतकऱ्यांना मिळणार रोजगारभंडारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रिक टन जैविक खत तयार होऊ शकते.तणसापासून फारसे उत्त्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते. बायो इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढला तर त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. हा प्रकल्प आपल्या मतदार क्षेत्रात आणण्यासाठी कटीबद्ध आहे.- डॉ.परिणय फुके, विधान परिषद सदस्य.