शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

तहकूब सभांमुळे वाढले भ्रष्टाचाराचे प्रमाण

By admin | Updated: June 27, 2016 00:35 IST

ग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत.

सभेबाबत अनास्था : ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणीराहुल भुतांगे  तुमसरग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत. मात्र ग्रामसभेला असणारी उपस्थिती पाहता ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत. गणसंख्येअभावी तहकूब होणाऱ्या सभांचे प्रमाण वाढू लागल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.आजही ग्रामीण भागात बहुतांश नागरीक ग्रामसभेविषयी अनभिज्ञ आहेत. ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभेत काय चालते? ग्रामसभेचे फायदे काय? ग्रामसभेची कार्ये कोणती? यासह अनेक प्रश्न हे ग्रामस्थांनी अजूनही अनुत्तरीतच आहेत. ग्रामस्थांनी निवडून दिलेले सदस्य ग्रामपंचायत चालवत असतात. परंतु ग्रामपंचायत ही मतदारांची संख्या असून ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या गावातील मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेला हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत मांडण्याचा प्रत्येक ग्रामस्थाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास करणे किंवा नाकारण्याचा अधिकार हा ग्रामसभेत हजर असणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला आहे. हे अधिकार बजावणे प्रत्येक ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ग्रामसभा या आजघडीला सत्ताधारी किंवा विरोधकांना गावपातळीवर श्रेयवादाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध होवू लागल्या ओत. ग्रामसभेत हजर राहून सुधारणा सूचविण्याऐवजी तसेच टीकाटिप्पणी करून गावातील नेत्यांचा रोष पत्करण्यापेक्षा ग्रामसभेला जाणे टाळण्यातच ग्रामस्थ धन्यता मानत आहेत. काही ठिकाणी पूर्ण बहुमतात असणाऱ्या व गावातील राजकारणात १०० टक्के वर्चस्व असणाऱ्या नेत्यांच्या दहशतीमुळे गावकरी ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचीही वास्तविकता आहे. ग्रामसभेत जे ठराव होतील त्यांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. परंतु लोकच जर ग्रामसभेला गेलेच नाही तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा मनमानी कारभार सुरु होतो. कुठे ग्रामसभेच्या आठ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, तर कुठे खोट्या सह्या व अंगठे घेवून सरपंच, ग्रामसेवक ठरवतील असे खोटे ठराव घेवून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठवून नको तिथे भ्रष्टाचार केला जातो. पदाधिकारी लक्षाधीश बनत चालला आहे व गरीब मात्र गरीबच राहत आहे. त्याचा कुठला विकास होत नाही हे वास्तववादी सत्य असले तरी याला कारणीभूत ती जनताच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.