शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मागण्या तातडीने पूर्ण करा; गोसे प्रकल्पबाधितांचे खासदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:00 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा गावात येऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मागील ३६ वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पबाधित जनता न्याय मागत आहेत. मात्र अद्यापही समस्या सुटलेल्या नाहीत. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा गावात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी खासदार डॉ प्रशांत पडोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 

प्रकल्पग्रस्तांच्यावतीने भाऊ कातोरे, वाल्मीक नागपुरे, प्रदीप निंबार्ते, जितेंद्र गजभिये, मंगेश वंजारी, अमरदास वंजारी, अंकोश पडोळे, चेतन राघोर्ते, संजय शेंडे, महेश सतदेवे, ब्रम्हानंद सतदेवे, सुरेंद्र रामटेके, ज्ञानेश्वर बावनकुळे, वसंता पडोळे आणि एजाजअली सय्यद यांनी पडोळे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक सभा घेण्यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

यात भंडारा- नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत १८ वर्षे पूर्ण नोंद असलेल्या वाढीव कुटुंबांना थेट आर्थिक लाभ देण्यासह वाढीव कुटुंबाला घरकुल आणि पॅकेजनुसार प्रति वाढीव कुटुंब घरबांधणीसाठी ८३,५०० रुपये अनुदान मिळावे, प्रकल्पग्रस्तांच्या कायम रोजगार निर्मितीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, धरणात पूर्ण संचय होण्यापूर्वी नव्याने बाधित होणाऱ्या भंडारा-नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचे पुनर्वसन आणि बाधित शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी प्रस्तावाला मंजुरी देऊन आर्थिक मोबदला मिळावा, अंशतः बाधित प्रकल्पग्रस्तांना पॅकेजप्रमाणे नोकरी ऐवजी एकमुखी रक्कम यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मार्गी न लावल्यास बाधित पुनर्वसित गावात आगामी विधानसभा निवडणुकीत लोकशाही मार्गाने प्रखर विरोध दर्शविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा