शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

जिल्ह्यातील ३९ पोलिसांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:23 IST

जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले.

ठळक मुद्देएसपींचे आदेश : सहा सहायक फौजदार, १३ हवालदार, २० नाईक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले.पोलीस दलातील हवालदार तुकाराम गभने, लक्ष्मण चोपकर, अरुण गंथाळे, धनराज जगनाडे, राजेश पोहरकर, सिद्धेश्वर थोटे यांना सहायक फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस नाईक दर्जाच्या सुनील भोवते, मंगल कुथे, टिकाराम कोरे, रमेश खोब्रागडे, दिनेश ठाकरे, तेजराम आस्वले, ईरशाद खान, केशव चचाने, संजय वाकलकर, चंद्रमणी तभाणे, राजेश बांते, राजेश पांडे, कांचन टेंभूर्णे यांना हवालदारपदी बढती देण्यात आली.जिल्ह्यातील २० पोलीस शिपायांना नाईक पदावर बढती देण्यात आली. त्यात पुरूषोत्तम थेर, प्रशांत तांडेकर, रसिका कंगाले, शिल्पा शेंडे, मिलिंद गभने, माधुरी रामटेके, श्रीकांत मस्के, किशोर हटवार, रामकृष्ण बावनकुळे, सतीश सिंगनजुडे, इंद्रायनी येलमुले, प्रदीप बोरकर, अतुल रायपुरकर, ईश्वर कढव, घनश्याम कोडापे, प्रमोद टेकाम, हेमलता आकरे, लक्ष्मी थोटे, मंगेश शिवनकर यांचा समावेश आहे. पदोन्नत झालेल्या या सर्वांना नियमानुसार वेतन वाढ मिळणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी एका समारंभात सर्व सहायक फौजदारांच्या खांद्यावर स्टार तसेच पोलीस हवालदार व नाईक यांच्या खांद्यावर पदनिदर्शक फित चढवून कौतूक केले. मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवून समाजाच्या विकासासाठी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.