शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबणीवर, चिंता बळावली

By admin | Updated: June 17, 2016 00:43 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला.

अर्धा मृग कोरडा : १.९० लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबलीवरठी : हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. संपूर्ण रोहिणी आणि अर्धे मृग नक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून आणखी काही दिवस लांबण्याचे संकेत हवामान खात्याने पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी १ लाख ९० हजार हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली असून पाणी टंचाईचीही तीव्रताही जिल्ह्यात कायमच आहे. जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाचा मारा झेलत आहे. नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात आशेचा किरण दाखविला. राज्यासह विदर्भात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. परंतु मान्सूनचे आगमन लांबले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खाते सांगत आहे.विदर्भात अद्यापही पावसाळी वातावरण तयार झाले नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्यात मान्सून बरसतो. शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागतो. परंतु काही वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. यंदाही असेच चित्र सध्या दिसत आहे. रोहिणी आणि अर्धा मृग संपला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. मुबलक पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. मात्र ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असा सल्ला कृषी खाते देत आहे. हवामान खाते, स्कायमेटने यंदा पाऊस वेळेवर येईल असे भाकित वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळाच्या नैराश्यातून शेतकरी बाहेर पडला. मोठ्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला. बँकात जाऊन पीक कर्जासाठी धडपड करू लागला. अवकाळी पाऊस कोसळल्याने आशा पल्लवीत झाल्या. कृषी केंद्रात बियाणांची चाचपणी सुरू झाली. परंतु १६ जूनपर्यतही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)