शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्ताची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:52 IST

प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून वीरुगिरी केली.

ठळक मुद्देआश्वासनानंतर माघार : जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून वीरुगिरी केली. यावेळी झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४५ मिनिटांपर्यंत खळबळ उडाली होती. विनोद दागोजी ढोरे रा.सरांडी (ता.लाखांदूर) असे वीरुगिरी करणाºया या तरुणाचे नाव आहे.सरांडी येथील विनोद ढोरे हा उच्चशिक्षित असून त्याची वडीलोपार्जीत शेतजमीन गोसे धरणाच्या डाव्या कालव्याकरिता संपादीत करण्यात आली आहे. जनहितासाठी कार्य करताना माझा विरोध नाही, मात्र कुटुंबाच्या पालनपोषणाकरिता शासकीय नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी विनोदने अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठविलेल्या निवेदनातून केली होती. विनोदचे वय वाढल्याने त्याला नोकरी मिळणे शक्य नसल्याने कुटुंबातील अन्य व्यक्तीला तरी शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणीही ढोरे यांनी केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर चढून स्वत:वर पेट्रोल टाकले. तसेच माझ्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा येथेच आत्मदहन करणार, अशी तंबी दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचाºयांसह असंख्य नागरिकांनी गर्दी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, एसडीपीओ संजय जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी झाडाभोवती गराडा घालून होते. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.आश्वासन मिळालेजिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विनोद ढोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विनोदचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी ढोरे यांच्या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहचवून त्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी विनोद ढोरे यांना दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूतमी सुद्धा एक प्रकल्पग्रस्त आहे. तुमच्या भावना मी ओळखू शकतो. परंतु मागणी पूर्ण करण्यासाठी आपण अवलंबिलेला मार्ग योग्य नाही. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. यासाठी आपणाला खाली येऊन माझ्या दालनात चर्चा करावी, अशी मी ग्वाही देतो, अशी समजूत चक्क जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विरुगिरी करणाऱ्या विनोद ढोरे याची काढली. यावेळी जिल्हाधिकारी व विनोद ढोरे यांच्यातील होत असलेली चर्चा उपस्थितांनी शांतपणे ऐकून घेतली. विनोदनेही जिल्हाधिकाऱ्यांचा मान ठेवत चर्चेसाठी तयार झाला. ४० मिनिटानंतर झाडावरून उतरल्यावर पोलिसांनी त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत नेले.