शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पीक पद्धत बदलातून कमविला नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:54 IST

तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : बोरी येथील यशस्वी उपक्रम, लक्षावधींची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.खोब्रागडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे शेतीत पारंपरिक पद्धतीने धान पिकांची लागवट करीत असत मात्र धन पिकात लागवतीचा खर्चही कधीकधी निघत नव्हता त्यामुळे खोब्रागडे यांनी धान पिकात बदल करत उसाची शेती केली.या उसाच्या शेतीत त्यांना धान शेतीपेक्षा चांगला नफाही मिळाला मात्र खोब्रागडे हे समाधानीं नव्हते त्यामुळे त्यांनी याच शेतीत काही वेगळा करू शकतो काय याचा विचार केलं,व इंटरनेटच्या र्नेटच्या माध्यमातून नवनवीन पिके लावण्याची माहिती घेतली. खोब्रागडे यांनी रक्त चंदनाची झाडे लावण्याचे ठरविले. त्यांनी एक एकर शेतीमध्ये २८० रक्त चंदनाची झाडे लागवड केली असून हे झाडे मोठे होण्याकरिता १५ वषार्चा कालावधी लागतो. तोपर्यंत यांच्या रिकाम्या जागी काही तरी पीक लागवड करायचे ठरविले. शेवग्याच्या शेंगाची लागवङ केली. शेवग्याच्या शेंगाची बियाणे हि बीड येथून खरेदी करून आणली व १०-१० च्या अंतरावर शेवग्याची बियाणांची लागवड केली. सहा महिन्यांच्या कालावधीत या झाडांना शेवग्याच्या शेंगा लागल्या असून शेवग्याचे झाडे लावण्याकरिता फक्त १० हजार रुपये खर्च आला आहे. या एक एकर शेतीमध्ये एक लाखाचा शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळत आहे. रक्त चंदनाच्या झाडांची आजघडीला एक झाडाची किंमत ही एक लाख रुपये आहे. येत्या काही वर्षात खोब्रागडे यांना दोन कोटीच्या वर उत्पन्न मिळू शकते. तर त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये उसाची लागवड केली आह. दोन एकर शेतीला ५० हजार रुपये खर्च आला असून दोन लाखाचा उत्पन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. , एकंदरीतच खोब्रागडे यांना तीन एकर शेतीत शेवगा व उसाला ६० हजार रुपये खर्च आला असून तीन लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ६० हजार खर्च वजा केला असता दोन लाख चाळीस हजार रुपये शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळणार आहे. खोब्रागडे यांच्या शेतावर काही शेतकरी भेटी देत असून इतरही शेतकरी आपल्या शेतावर या पद्धतीची शेती लागवड करणार असल्याचे सांगत आहे, शासनाची कोणतीच मदत नसतांनी शेतकºयांनी संशोधन करुन आर्थिक प्रगती करीत आहेत किमान कृषि विभागाने बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी