शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

कामगारांच्या समस्या पोहचल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक लॉकडाऊनच्या संकटकाळामध्ये कामगारांना कामावरून काढण्यात आले.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मुजोरी : अन्यायग्रस्तांसाठी शिवसेना सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नगरपालिका तुमसर येथे सफाई कंत्राटदाराने दुलक्षीत केलेल्या त्या १६ कामगारांच्या समस्यांचा पाठपुरावा शिवसेनेमार्फत थेट जिल्हाधिकारी दालनात करण्यात आलेला आहे. कामावरुन नियमबाह्य पद्धतीने कमी करण्यात आलेल्या त्या सफाई कामगारांच्या समस्येची सुनावणी यापुर्वीही आयुक्तांच्या दालनात झाली होती. मात्र प्रशासकिय यंत्रणा व नियमांना न जुमानता त्या कंत्राटदाराने आपल्या मुजोरीचे उदाहरण दिले आहे. येथे कोरोनाच्या ताळबंदीच्या मोठ्या कालखंडात त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.याचीच दखल शिवसेनेने घेवून कामगारांच्या हक्काचा एक एल्गार जिल्हास्तरावर पुकारला आहे. येथे शासन व प्रशासनापेक्षा तो कंत्राटदार मोठा कसा? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात शिवसेनेने न्याय मिळण्याची मागणी कामगारांच्या बाजुने मांडली हे विशेष!तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक लॉकडाऊनच्या संकटकाळामध्ये कामगारांना कामावरून काढण्यात आले.सदर कामगारांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना संपूर्ण परिवाराचे पालन, पोषण करणे कठीण झाले आहे. यासाठी कामगारांना कामावर घेऊन न्याय मिळवून देण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाची प्रत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री सुनिल केदार यांना देण्यात आले आहे. यावेळी निवेदन सादर करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. रवी वाढई, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, माजी उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, सफाई कामगार संतोष भोंडेकर, जितेंद्र भवसागर, मारोती बर्वे, गोविंद भोंडेकर, कमल कनोजे उपस्थित होते. अन्यायासाठी शिवसेना पदाधिकारी सरसावल्याने तुमसर येथील त्या कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.कामगारांची सुरक्षा हवेवरसफाई कामगार भगवान चौधरी रा. गांधी नगर तुमसर यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही त्यांच्या परिवाराला कोणतीही सुरक्षा, विम्याच्या मोबदला मिळाला नाही. जे कंत्राटदाराने नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यात नमूद केले आहे, ते कसलेही अटी शर्ती पूर्ण केले नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी