शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरात समस्याच समस्या, नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:55 IST

ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमूलभूत सोईसुविधांचा अभाव : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘नाव मोठे दर्शन खोटे’ची प्रचिती

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.नगर परिषदेने येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला आहे. पण पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे या मुख्य सुविधा दिल्या नाहीत. नाल्या नसल्यामुळे सांडपाणी जागोजागी जमा होत आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होत आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.पवनी शहरात बसस्थानकाजवळ निलज, कारधा राज्यमार्ग क्रमांक २४१ ला लागून शिवाजी नगर वसले आहे. या नगरातील सुंदर, अद्यावत इमारतींनी या नगरासोबतच पवनी शहरालाही सुंदर केले आहे. या नगराजवळून गोसीखुर्द धरणाचा उजवा कालवा वाहतो. शिवाजी नगराजवळूनच पवनी शहरातील जनता सकाळी-संध्याकाळी फिरायला जाते. येथे कोणीही सर्वप्रथम आल्यास प्रथम पसंती त्यांची शिवाजीनगर असते. पण शिवाजीनगर जरी सुंदर दिसत असले तरी येथील नागरिक अनेक समस्यांशी झुंजत आहेत. पावसाळ्यात येथे प्रवेश करताच चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढावा लागतो. दुचाकी वाहनांना सांभाळूनच गाडी चालवावी लागते. येथे पक्के रस्ते नाहीत. या नगराचा समावेश अगोदर बेटाळा ग्रामपंचायतमध्ये होता. येथे अनेक समस्या आहेत. त्यामुळेच येथील नागरिकांनी पवनी न.प. मध्ये समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर नगरपरिषद हद्दवाढीमध्ये शिवाजी नगराचा समावेश पवनीत झाला. न.प. ने मोठ्या प्रमाणात येथून कर वसुली केली पण समस्या सोडविल्या नाही. येथे अनेक ठिकाणी पथदिव्यांची, नाल्यांची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घराबाहेर निघणे धोक्याचे आहे. विषारी सरपटणाऱ्या जीवांचा धोका आहे.नाल्या नसल्यामुळे जागोजागी सांडपाणी जमा झाले आहे व रस्त्यावरूनही वाहत जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विषाणूजन्य ताप हे येथील जनतेसाठी नेहमीचे झाले आहे. येथील जनतेने अनेक वेळा नगरपरिषदकडे लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडल्या. पण दुर्लक्ष होत आहे. याच समस्या शेषनगर, न्यू शेषनगर, वैभवलक्ष्मी नगर, प्रेमनगर यांच्याही आहेत.