शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:38 IST

केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही.

ठळक मुद्देमोहाडीत कर्मचाऱ्यांची बैठक : मानधनवाढीचा प्रश्न निकाली निघेना

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही. राज्य सरकारने मानधन वाढ कमेटीने केलेली मानधन वाढ शिफारस लागू केली नाही. असा आरोप जिल्हा अध्यक्ष सविता लुटे यांनी केला.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा (आयटक) तालुका मेळावा बुध्द विहार मोहाडी येथे घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उदघाटन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रिता लोखंडे यांनी तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. कश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना आदराजंली देण्यात आली. अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविका १२५० रुपये व मदतनिसांना ७५० रुपये मानधनवाढ जाहिर केली. काही राज्यात ती लागू झाली. मात्र महाराष्ट्र शासनाने लागू केली नाही. असंघटीत कामगारावर अन्याय केला, असे प्रतिपादन सविता लुटे यांनी म्हटले.अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची दुटप्पी भुमिका याबाबत संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्थानिक प्रश्नावर प्रकाश टाकीत सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न जनश्री विमा योजना. स्टेशनरी, प्रवास भत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी शालु कापसे, निर्मला बांते, लता वैद्य, आशा नंदनवार, संजू लोंदासे, आर्चना ढेंगे, वहिदा शेख, संगीता मारबदे, गौतमी धवसे, निर्मला भोयर, मंजुलता पराते यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्तविक अल्का बोरकर यांनी केले. संचालन फाईमा शेख तर आभार सुनिता कारेमोरे यांनी केले. मेळावासाठी जयश्री धांडे, माया मोटघरे, मेघा मोटघरे, लिला बडवाईक, अनिता ईटनकर, आशा मेहर, सुनिता मोटघरे, देवाला धांडे यांनी सहकार्य केले.