भंडारा : खासगी प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय सहविचार सभा मंगळवारी केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा येथील पा. वा. नवीन मुलींची शाळा येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, जिल्हा कार्यवाह विलास खोब्रागडे, धनवीर काणेकर, अरुण मोखारे, वीणा कुर्वे आदी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांना ‘सॅलरी पॅकेज’च्या विविध सुविधा मिळण्याच्यादृष्टीने शिक्षकांचे राष्ट्रीयीकृत बँकेतून वेतन अदा करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, एक तारखेचे नियमित वेतन, जुनी पेन्शन योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे, जीपीएफ /मेडिकल बिले व थकीत देयके इत्यादी प्रलंबित समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी प्रेमलाल मलेवर, तेजराम बांगडकर, रामरतन केवट, कमलेश चिर्वतकर, निलेश धर्मे, सुनील मेश्राम, ईश्वर बावणे, विजय बघेले, रमेश कहालकर, जीवनसिंग खासवात, हिरालाल ढोणे, पराग शेंडे इत्यादी शिक्षक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.