शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

कैद्यांची मानसिकता बदलाचा ‘योग’

By admin | Updated: December 12, 2015 00:38 IST

एखाद्या गुन्ह्यात नकळंत अडकलेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.

जिल्हा कारागृहात योग प्राणायाम : २०० जणांनी घेतला लाभभंडारा : एखाद्या गुन्ह्यात नकळंत अडकलेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. यामुळे अनेकदा निरपराध कैदी मोठ्या गुन्हेगारीकडे वळतो. अशा कैद्यांची मानसिकता बदलविण्याची नितांत गरज असते. हे हेरून भंडारा येथील योग प्राणायाम शिक्षकांनी जिल्हा कारागृहातील कैद्यांना योगाचे धडे देऊन त्यांना मानसिक समाधान दिले. छोट्या-मोठ्या गुन्ह्यातील अनेक आरोपी जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. किंवा अनेकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. यात अनेकजण कदाचित निरपराधही असू शकतात. मात्र, ही न्यायालयीन बाब आहे. जिल्हा कारागृहातील असलेला कैदी हा वेगळ्या मानसिकतेतून जात असतो. त्यांची मानसिकता ढासळू नये, यासाठी व त्यांना समाजात पुन्हा तीच वागणूक मिळेल. या अपेक्षेसहक भंडारा येथील पंतजली योग समिती (मिस्कीन टँक) योग उद्यान व योग भारती बहुउद्देशीय संस्था भंडारा यांच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून कारागृहातील कैद्यांना योग प्राणायामचे धडे गिरविण्यात येत आहे. योगातून कैद्यांची बनलेली मानसिकता बदलविण्याचा मोठा योग यातून करण्याचा प्रयत्न योग शिक्षकांनी केला आहे. कैद्यांना योग शिक्षक शाम कुकडे, शालीकराम झंझाड व यशवंत गायधनी यांनी रोज सकाळी एक तास योग धडे दिले. यांनी कैद्यांनी योगासन, प्राणायाम, अष्टांग योग साधना, सुर्यनमस्कार, ध्यान, धारना व आयुर्वेद औषधोपचाराची सात दिवसीय शिबिरातून मार्गदर्शन केले. मागील दहा वर्षापासून हे शिक्षक कारागृहात योग धडे गिरवित असून अनेकांना आता ते नित्यनेमाने करण्याची सवय जडली आहे. कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे मनावर विपरीत परिणाम पडलेले कैदी यातून बाहेर पडले आहेत. नियमित योग प्रात्यक्षिक करीत असल्याने त्यांना अपराधीक जीवनाच्या कचाट्यात सापडल्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्याचा प्रत्यय आल्याचे काही कैद्यांनी यावेळी सांगितले.सात दिवस चाललेल्या योग प्राणायाम शिबिराला कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे, कारागृह कर्मचारी मानिक काळे, धनश्याम रहांगडाले, लाला मोटघरे, अरविंद मेश्राम, अनिल खंडाळे, हेमराज शेंडे, भुपेश राजीले, अमित कोठारकर, कविता मरगदे, ललीता पाटील आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)