शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

आरोपीला आजन्म कारावास

By admin | Updated: August 10, 2014 22:48 IST

अतिप्रसंग व लुटमार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला आजन्म कारावास तर दुसऱ्या सहकारी आरोपीला पाच हजार रुपये दंड अथवा एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : प्रकरण साकोली तालुक्यातील मिरेगाव येथीलसाकोली : अतिप्रसंग व लुटमार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला आजन्म कारावास तर दुसऱ्या सहकारी आरोपीला पाच हजार रुपये दंड अथवा एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण साकोली तालुक्यातील मिरेगाव येथील दोन वर्षापूर्वीचे आहे.साकोली तालुक्यातील मिरेगाव येथील पिडीत महिला ही ५ डिसेंबर २०१२ रोजी मिरेगाववरून मुलीच्या औषधीकरिता लाखनी येथे जात होती. मात्र साधन नसल्याने ही महिला पायी जात असताना वाटेत तिला आरोपी डुडेश्वर मडावी (२८) व प्रवीण मडावी (२१) येताना दिसले. पीडित महिलेनी त्यांना थांबवून मुंडीपार फाट्यापर्यंत लिफ्ट मागितली. आरोपीने लाखनीला जात असल्याचे सांगून महिलेला मोटारसायकलवर बसवून लाखनी येथे नेले. लाखनी येथे महिलेनी औषधी घेतल्यानंतर आरोपींनी पुन्हा या महिलेला मिरेगाव येथे सोडून देतो असे सांगून तिला त्यांना मोटारसायकलवर बसवून मुंडीपार फाट्यापर्यंत आणले व येथे आल्यानंतर गाडीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा केला. त्यामुळे ही महिला मुंडीपार फाट्यापासून मिरेगाव येथे पायी जाण्यास निघाली असता दोन्ही आरोपींनी या महिलेचा पाठलाग केला. मिरेगाव मार्गावरील जंगलात डुडेश्वर मडावी याने महिलेला पकडून जंगलात ओढत नेले व मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, बिरी व गरसोळी असे एकूण १७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत ३४ हजार रुपये मुल्याचे हिसकावून नेले. या हाणामारीत महिला बेशुद्ध पडली. काही वेळानंतर महिला शुद्धीवर आल्यानंतर गावी पोहचली. झालेल्या अन्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक १४३(१२) अंतर्गत कलम ३९४, ३९७, ३७६, १०९, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिनव देशमुख यांनी केला होता प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. जिल्हा सत्र न्यायाधीश जी.के .अकर्ते यांनी दि. ७ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपी डुडेश्वर मडावी यास कलम ३९४, ३९७ नुसार १० वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच कलम ३९४, ३९७ नुसार १० वर्र्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच कलम ३५६ कलमांतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दुसरा सहकारी आरोपी प्रवीण मडावी याला ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय अधिवक्ता म्हणून सुषमा सिंग यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून अंशूल केसळकर होते तर आरोपीकडून अ‍ॅड.के.एस. भुरे व अ‍ॅड.येळेकर यांनी युक्तिवाद केला. (तालुका प्रतिनिधी)