शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी थांबता थांबेना, प्रवाशांची लूट, सुविधाही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 16:10 IST

दिवाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत.

ठळक मुद्देकारवाई करण्याची मागणी

भंडारा : वाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत.

कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात सापडला आहे. आता कुठे हळूहळू ट्रॅव्हल्सची चाके पूर्वपदावर येत आहेत. त्यातच डिझेल दरवाढीचा फटका बसत असून, वाढत्या महागाईनुसार ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत.

दिवाळी सणानिमित्ताने शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच अन्य कामानिमित्ताने बाहेरगावी असलेले नागरिक आपल्या मूळगावी परततात. दिवाळीनिमित्त सर्वाधिक पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याचाच फायदा घेत ट्रॅवल्स चालकांनी तिकिटांचा मनमानी दर वाढवला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात आहे, तर दुसरीकडे दिवसेंदिवस डिझेलची दरवाढ होत असल्याने ट्रॅव्हल्स चालकांना तिकिटाची दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे चालक सांगत आहेत. चालकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चामुळे तिकिटाचे दर वाढले आहेत. प्रवाशांच्या खिशाला मात्र यामुळे कात्री लागत आहे. या काळात खासगी वाहनांची चलती असून प्रवासी ऑनलाइन ट्रॅव्हल्स बुकिंग करीत आहेत. यात विम्याच्या नावाने आणखी भर पडली आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी ग्राहकांची लूट थांबविली पाहिजे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. ट्रॅव्हल्सच्या तिकिटांच्या दरावर आरटीओ ऑफिसने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूक