शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अधिकाऱ्यांच्या कारवाईसाठी आंदोलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:40 IST

सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देसिरसोलीचे प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात आंदोलनाची पुर्वसुचनाही देण्यात आली आहे.सिरसोलीच्या शिवलाल लिल्हारे यांचे आबादी प्लॉटवरील महसूल प्रशासनाच्या वतीने घर पाडण्यात आले. त्यांच्या हक्काचा निवारा उध्वस्त केला गेला. त्यामुळे शिवलाल त्यांची पत्नी असुविधायुक्त ग्रामपंचायतच्या कार्यालयात राहत आहेत. शिवलाल लिल्हारे यांनी आबादी प्लॉटवर घर बांधले तो २०१२ पासून तिथे राहत होता. ग्रामपंचायतच्या नमुना आठ वर भोगवटदार म्हणून त्याचा नावाची नोंद केली गेली. त्याने ग्रामपंचायतचा करही भरला आहे.महसूल प्रशासनाने एक वर्षाचे वर ताबा असलेल्या जागेवरचे घर पाडले. घराच्या मातीत जिवनावश्यक वस्तूही दाबून टाकल्या. तत्कालीन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या सुचनेचे पालन केले गेले नाही. घर पाडतानी तीन नोटीस दिल्या नाहीत. तसेच शिवलालला मुदतवाढही दिली गेली नाही. शिवलालनी आबादी प्लॉट मिळावा, यासाठी तहसीलदार मोहाडी यांना अनेकदा मागणी केली. तथापि, त्यांना पट्टा दिला गेला नाही. त्यानंतर घर पाडण्याची चुकीची कारवाई कारवाई केली गेली. आंदोलन, घेराव झाले.उपविभागीय अधिकारी तोंडगावकर यांच्या उपस्थितीत उपोषण सोडविण्यात आले. विविध मागण्या पुर्ण केल्याचे पत्र तहसीलदार धनंजय देशमुख यांनी दिले.शिवलाल लिल्हारे यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी. न्याय देण्यात यावा. खोटी तक्रार करणारे तहसीलदार धनंजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी. प्रतिनिधी मंडळावर लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच चुकीची कारवाई करणारे नायब तहसीलदार कातकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा २४ जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात माधवराव बांते, विजय शहारे, डॉ. पंकज कारेमोरे, राजू कारेमोरे, किरण अतकरी, कमलाकर निखाडे, डॉ. सुनिल चवळे, अनिल काळे, सलिम शेख, नरेश डहारे आदींचा समावेश होता.‘त्या’ बालकांचे उपोषण सुरुचसिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांचे दहा दिवसापासून साखळी उपोषण सुरुच आहे. अजूनही प्रशासनाने कोणताच तोडगा काढला नाही. शिवलाल लिल्हारे यांचे महसुल प्रशासनाने घर पाडल्यानंतर लिल्हारे दाम्पत्य बेघर झाले. हक्काचा निवारा मिळावा यासाठी शिवलालची सतीश व समीर ही किशोवयीन बालके मोहाडी तहसील कार्यालयासमोर दहा दिवसापासून साखळी उपोषणावर बसली आहेत. तहसीलदार यांनी पाडलेल्या घराचा पट्टा देण्यासाठी जाहीरनामा काढला होता. त्याची मुदत संपली. त्यानंतर गावातील काही आक्षेप आले. त्यामुळे त्या जागेचा पट्टा शिवलालला लिल्हारे यांना मिळणार काय, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. सिरसोलीच्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.तहसील कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी तुमसर यांचेकडे सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या आबादी प्लाटसंबधी प्रकरण पाठविले आहे.-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.