शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:29 IST

यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही.

पावसाची प्रतीक्षा : शामकुंवर यांचे शेतकऱ्यांना आवाहनसाकोली : यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथे १ ते १५ जुनपर्यंत सरासरी पाऊस ३२ मिमी असतो पंरतु यावर्षी १ ते १५ जून २०१६ या काळात फक्त ३.४ मिमी पाऊस पडला. हा पाऊस कोरडवाहू क्षेत्रात धान पेरणीसाठी समाधान कारक नाही. त्यामुळे कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या, असे आवाहन भात पैदासकार डॉ.बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. १६ ते ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस १६०.३९ मिमी पडतो, परंतु यावर्षी १६ ते २३ जूनपर्यंत फक्त १७ मिमी पाऊस बरसला आहे. २२ ते ३० जून २०१६पर्यंत १४४.७९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. ओलिताची सोय (बोअरवेल, विहीर) असलेल्या शेतकऱ्यांनी धान बियाणे पेरणी केली असून काही ठिकाणी सुरु आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही त्यांनी अजूनपर्यंत पेरणी केली नसून पावसाची वाट बघत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी २२ ते २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणी करावी. यामध्ये कमी कालावधीच्या लवकर निघणाऱ्या ११५-१२० दिवसाच्या धान वाणांना प्राधान्य द्यावा. कृपया मध्यम कालावधी जसे १३०-१३५ दिवस व उशिरा कालावधी १३६-१४५ दिवसाच्या धान वाणाची पेरणी सुरु करु नये. ११५ ते १२० दिवस कालावधीचे धान वाण २२ ते २५ जूनपर्यंत पेरणी केल्यास व या काळात चांगला पाऊस झाला व त्यानंतर रोवणी २० ते २५ दिवसाच्या रोपांची केल्यास हे पिक १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान फुलोऱ्यात येईल. कुबेरा अवस्था, त्या अगोदर व त्यानंतर १५ दिवस धान पिकाला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. ५ ते १० सेमी पाण्याची पातळी, ते सहजपणे उपलब्ध होण्याची शक्यता असते व हे पीक २४ आॅक्टोबरपर्यंत कापणीसाठी तयार होऊन समाधानकारक उत्पादन मिळते. ओलीताची सोय नसणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी १२५ ते १४५ दिवसपर्यंत कालावधीच्या धान वाणांची निवड व प्रेरणी करु नये कारण सप्टेंबर नंतर परतीच्या पाउसाला सुरुवात होते. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत सरासरी पाऊस ६९.२७ मिमी असतो व त्यानंतर १ ते १५ आॅक्टोंबर पर्यंत २०.८८ मिमी पाऊस पडतो. उशिरा कालावधीचे वाण या कालावधीत फुलोरा अवस्थेत असतात व त्यांना पाण्याचा ताण पडतो. उत्पादनात घट येते. शेतकरी बांधवांनी जमीन तयार असल्यास रोपवाटिका (पऱ्हेखणी) तयार करुन १ मीटर रुंद, १० सेमी उंच व योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करुन ठेवावे, समजा २ ते ४ दिवसात सतत पाऊस पडल्यास व नंतर उघाड दिल्यास गादीवाफ्यावर बियाणांची पेरणी करणे सोपे जाते. शेतकरी चिखलपऱ्हे टाकतात. त्यामध्ये रोपे उपटतानी त्यांची मुळे तुटतात व रोपांना इजा होते व रोवणी झालेली बरीच रोपे मरतात. माहितीसाठी कृषी संशोधन केंद्र साकोली किंवा जवळच्या तालुका मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्कसाधावा असे आवाहन डॉ. बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)