शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाचे अवकाळी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवातावरणात प्रचंड गारठा : हरभरा, लाखोरी, तूर पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरत्या वर्षाच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत असून तीन दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. हरभरा, लाखोरी, तूर या पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले असून आधारभूत केंद्रावरील धान ओलाचिंब होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या सततच्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भंडारा शहरासह तुमसर, पवनी, लाखनी, साकोली, मोहाडी, लाखांदूर तालुक्यात गुरुवारी सकाळी मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. वीजांचा कडकडाटही होत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. तुमसर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळला. मोहाडी शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जांब लोहारा परिसरात जोरदार पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह शहापूर, जवाहरनगर येथे जोरदार पाऊस कोसळला. वरठी परिसरात सकाळपासूनच पाऊस कोसळत होता.वरठी येथे सकाळी ९ वाजता पावसाला प्रारंभ झाला. थंडीचा पारा घसरल्याने कामाची गती मंदावली. वरठी येथील आठवडी बाजारालाही या पावसाचा फटका बसला. करडी परिसरात तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. पालोरा येथील धान खरेदी केंद्राला तळ्याचे स्वरुप आले होते. खरबी परिसरात पावसाने हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. विष्णुदास हटवार, दसाराम वाघमारे, राकेश गायधने, बाबुजी गायधने, धनराज गायधने, दुर्योधन गायधने, श्रीकृष्ण गायधने, मोरेश्वर गायधने, लोमेश्वर वाघमारे यांच्या शेतातील हरभरा पीक पाण्याखाली आले.या पावसाने रबी पीकांचे मोठे नुकसान होत असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने ठिकठिकाणी भरदिवसा शेकोट्या पेटविल्याचे दृष्य दिसत होते.गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. धान ओला होत असून हरभरा, लाखोरी, तूर आदी पीकांचे नुकसान होत आहे. धान विक्रीसाठी न्यावा तर तेथे मोठी प्रतीक्षा करावी लागते. निसर्गाच्या या लहरीपणापुढे आम्ही हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.लाखांदूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेकडो पोती उघड्यावर आहेत. या धानाच्या संरक्षणासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने धान ओले होत आहेत. यासोबतच तालुक्यात हरभरा, वाटाणा, लाखोरी, उडीद, मुग, जवस आदी पिकांचेही अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. तूर व भाजीपाला पिकाचेही प्रचंड नासाडी होत आहे. वातावरणात प्रचंड गारठा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य दिसत आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आहे.तुमसर तालुक्यात गारांचा वर्षावतुमसर तालुक्यातील रेंगेपार परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बोराच्या आकारांचा गारांचा वर्षाव झाला. पांजरा, तामसवाडी यासह सिहोरा परिसरातील काही गावात दुपारी गारांचा वर्षाव झाला. अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिहोरा परिसरातील भाजीपाला पिकाला या गारांचा मोठा फटका बसला.२४ तासात १०.६ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ६१.३ मिमी पाऊस कोसळला होता. गत २४ तासात शहापूर परिसरात १० मिमी, भंडारा ५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ३ मिमी., तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ७.३ मिमी, तुमसर ८.३ मिमी, सिहोरा १७.२ मिमी, मिटेवानी ६.२ मिमी, गर्रा १५ मिमी पावसाची नोंद झाली.धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळजिल्ह्यातील बहुतांश सर्वच आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकºयांचा धान उघड्यावर आहे. अवकाळी पाऊस बरसत असल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होतांना दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात असलेला धान झाकणे शक्य होत नाही. ताडपत्री टाकल्यानंतरही धान ओला होत आहे. काही ठिकाणी तर सततच्या पावसाने पोत्यातीलच धान अंकुरल्याचे दिसत आहे. ओला झालेल्या धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान वाळविण्याशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :Rainपाऊस