शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे.

ठळक मुद्देसर्वदूर पावसाची हजेरी : कापलेला धान झाला ओलाचिंब, भाजीपाला पीकही संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवार रात्री ते मंगळवारी सकाळपाळीत पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यात उन्हाळी धानपिकासह भाजीपाला पीक संकटात सापडले आहे. परिणामी बळीराजाचे टेंशन अजून वाढले आहे.हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. कठाण पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.पालांदूर जवळील वाकल येथे वीज खांबावर वीज कोसळल्याने इन्सूलेटर व तार तुटले. यामुळे तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. पालांदूर परिसरातील गावे अंधारात होती. तसेच धानाची मळणी व कापणी केल्यासह धान खरेदी केंद्रावर आणलेला धान या पाण्यामुळे ओला झाला. मेंगापूर धान खरेदी केंद्रावर हे दृष्य बळीराजाला चिंतेत घालणारे होते.लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धानपिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. धान कापणीला व मळणीला वेग आला असतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे धानपिक जमीनदोस्त झाले. धानपिकावर पाणी गेल्याने धानाची पोत खराब होऊन खुल्या बाजारात धानाचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांना या पावसाचा हंगामपूर्व व मशागतीसाठी पिकाला फायदा होणार असला तरी उन्हाळी धान उत्पादकांसाठी मारक ठरला आहे.ग्रामीण क्षेत्रातही दमदार हजेरीसोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना चिंतेत घातले आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊस बरसला. पवनीत सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्या. मोहाडी सह ग्रामीण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली. लाखनी शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने शहरात मात्र तितका परिणाम जाणवला नाही. करडी परिसरात पाऊस बरसला असून याचा रोहयो कामावर परिणाम जाणवला. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून तलावात पाणी साचले आहे. आसगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला.

टॅग्स :Rainपाऊस