शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; २०७२ शेतकऱ्यांची पिके मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:51 IST

प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल : यंदा तरी आर्थिक मदत मिळणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत सहा दिवसांपासून अवकाळी व मान्सूपूर्व पावसाने उन्हाळी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पावसामुळे धान पिकासह अन्य पिके जमीनदोस्त झाल्याने तब्बल २०७२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

१९ ते २५ मेपर्यंत बरसलेल्या पावसाने जिल्हाभरातील ९७७हेक्टरमधील शेतपिके बाधित झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालात म्हटले आहे. परिणामी एकूण पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढणार यात शंका नाही.

भंडारा तालुक्यातील ६९५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी २५६ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून ३३९ शेतकरी प्रभावित झाले आहे. मोहाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ६७५ हेक्टरमधील पिके नुकसानग्रस्त झाली. यात १६०६ शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. तसेच तुमसर तालुक्यातील १२० शेतकरी प्रभावित झाले. तर लाखनी तालुक्यातील सात शेतकऱ्यांचा समावेश आहे. उन्हाळी हंगामात एकूण ७१ हजार २२१ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती.

पवनी, साकोली आणि लाखांदूर निरंकजिल्हा प्रशासनाच्या नुकसानीच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालात पवनी, साकोली आणि लाखांदूर येथे नुकसान झाले नाही, असे दाखविण्यात आले आहे. एकंदरीत मात्र अड्याळ परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

उत्पादनाची आशा मावळलीउन्हाळी हंगामात मोठ्या हिमतीने अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली होती. मात्र आलेल्या पावसाने डोळ्यादेखत होत्याचे नव्हते केले. धान जमीनदोस्त झाले. कडपांना अंकुर फुटले. शेतपीक पिकविण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र शेवटी अस्मानी संकटाने उत्पादनाची आशा मावळली आहे. पसाभर तरी धान पदरी लाभणार काय, अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये होत आहे . 

३३ टक्क्यांवर बाधितजिल्हा प्रशासनाच्या नजरअंदाज प्राथमिक अहवालात ३३ टक्केच्याआत बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६७७ इतकी आहे. तर ३३ टक्क्याच्यावर बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १३९५ आहे. नुकसान झालेल्यामध्ये उन्हाळी भात, भाजीपाला व फळ पिकांचा समावेश आहे. झालेले नुकसान हे अंदाजीत असून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणानंतर आकडेवारीत बदल होवू शकतो, असेही प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :bhandara-acभंडारा