शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

भागवत प्रवचनात जगाच्या कल्याणाची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:03 PM

भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. भागवतात जगाचे कल्याणाची शक्ती आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. भागवत प्रवचन ऐकताना देहभान हरपून जाते हीच भागवताची खरी शक्ती आहे. असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.

ठळक मुद्देवर्षा पटेल : सीतेपार येथे भागवत प्रवचन, मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. भागवतात जगाचे कल्याणाची शक्ती आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. भागवत प्रवचन ऐकताना देहभान हरपून जाते हीच भागवताची खरी शक्ती आहे. असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.सितेपार येथे आठ दिवसीय भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आले होते. हभप टेकाम महाराज यांनी आपल्या वाणीने भागवताचे अनेक पैलू मांडून शेकडो भाविकांना मंत्रमुग्ध केले. गं्रंथपूजा माजी जि.प. सदस्य विठ्ठलराव रहमतकर यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी भंडारा जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, पोलीस पाटील भुपतराव सार्वे, सरपंच गजानन लांजेवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भागवत सप्ताहात ग्रामस्थांकरिता सरपंच गजानन लांजेवार यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी, औषध वितरीत करण्यात आले. १२० गरजूंना चष्मे विनामुल्य वितरीत करण्यात आले. दहीहंडी व गोपालकाला कार्यक्रमानंतर खा.मधुकर कुकडे यांच्या विकासनिधीतून १० लाखांचे रस्त्याचे भूमिपूजन वर्षाताई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा.मधुकर कुकडे, माजी आ.अनिल बावनकर, राजू कारेमोरे, सुरेश रहांगडाले, देवचंद ठाकरे, सभापती रेखा ठाकरे, जि.प. सदस्य प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, शुभांगी रहांगडाले, सभापती धनेंद्र तुरकर, अरविंद राऊत, राजू ढबाले, डॉ.पंकज कारेमोरे, विठ्ठलराव कहालकर, उमेश कटरे, मदन भगत सह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.आ.चरण वाघमारे यांनी भागवत प्रवचनाला भेट दिली. खनिज विकास निधीतून १५ लाख निधी विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली. भागवत प्रवचन एक जीवन शैली असून ग्रामीण भागात संस्कृती आजही टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवचनापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन आ.चरण वाघमारे यांनी केले.भागवत प्रवचनाकरिता सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार, पोलीस पाटील भूपतराव सार्वेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.