शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रिमझीम पावसातही शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: October 13, 2014 23:18 IST

बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज मंगळवारला सायंकाळी थंडावल्या. दरम्यान आज दुपारी सर्वच पक्षांनी दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. सकाळपासूनच रिमझिम

भंडारा : बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज मंगळवारला सायंकाळी थंडावल्या. दरम्यान आज दुपारी सर्वच पक्षांनी दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाला झुगारुन शिवसेना आणि बहुजन समाज पार्टीने शहरातून रॅली काढली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीची अधिसुचना १२ सप्टेंबरपासून लागू झाली. सर्व प्रक्रिया आटोपून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी मिळाला. यादरम्यान सर्वच उमेदवारांनी जिवाचे रान करीत प्रचार केला. पहिल्यांदा नामांकन दाखल करताना आणि दुसऱ्यांदा प्रचार संपण्याच्या वेळेपूर्वी शक्तीप्रदर्शन करीत मिरवणुका काढल्या. यावेळी उमेदवारांनी प्रचार साहित्यासह डिजेचा वापर करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची दुचाकी महारॅलीप्रचाराची रणधुमाळी सायंकाळी संपली. शिवसेनेच्यावतीने मंगळवारला भंडारा आणि पवनी शहरातून मिरवणूक काढून शहरात वातावरण निर्मिती केली. मतदानाला काही तासांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे उमेदवारांनी आता गुप्त प्रचारावर भर द्यायला सुरुवात केली आहे. या मिरवणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, अनिल गायधने, सुनिल कुरंजेकर, तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, विजय काटेखाये यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शेकडो दुचाकीस्वार झेंडे घेऊन सहभागी झाले होते. पवनी शहरातून शुभारंभ झालेली ही रॅली कोंढा, अड्याळमार्गे भंडारा येथे पोहोचली. यात विजयाची घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत तरुणांची संख्या अधिक होती.बसपाच्या रॅलीने शहर दुमदुमलेनिवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवांगणा गाढवे यांनी भंडारा शहरात प्रचार रॅली काढून वातावरण निर्मिती केली. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या या रॅलीतद्वारे महिलांनी शहर पिंजून काढले. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाहत होता. नागपूर नाका येथून प्रारंभ झालेल्या रॅलीने तकीया वॉर्ड, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड आणि शहराच्या अन्य भागातून संपर्क अभियान राबविले. ठिकठिकाणी महिलांनी देवांगणा गाढवे यांचे स्वागत केले. बसपाच्यावतीने दसरा मैदान येथूनही दुचाकी रॅली काढण्यात आली. नागपूर नाक्यापासून सुरु झालेली ही रॅली श्हरातील सर्वच मार्गाने भ्रमण केली. यावेळी देवांगणा गाढवे यांनी मतदारांना अभिवादन करीत होत्या. या रॅलीत बसपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाढवे, जिल्हा प्रभारी संजय भिवगडे, प्रिया शहारे, सुरेश कोहळे, हेमलता गजभिये, मनोरमा मोटघरे, किरदास मेश्राम, विजय रंगारी, मनोज गोस्वामी, महेश मेश्राम, कुजन शेंडे, प्रेम वासनिक, राजू गजभिये, भीमराव बोरकर, भैय्यालाल गजभिये, नरेश मेश्राम, संजय गजभिये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.सर्वच पक्षांच्या मिरवणुकाआज मंगळवारला सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार असल्यामुळे शिवसेना, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांच्यावतीने त्या-त्या विधानसभा क्षेत्रात मिरवणूक काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. (प्रतिनिधी)