शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:07 IST

उकाड्याचाही फटका : आबालवृद्धांना त्रास; वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने लघु व्यावसायिकही अडचणीत सापडल्याचे चित्र आहे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :तुमसर शहर व तालुक्यातील १५० गावांत मागील महिन्याभरापासून सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयुष्य संपलेल्या तारातून वीजपुरवठा केला जात आहे. त्याच्या फटका येथे सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तरीसुद्धा दिवसातून किमान चार ते पाच वेळा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अधूनमधून उन्ह तापत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

तुमसर शहराची लोकसंख्या सुमारे ७० हजारांच्या घरात असून तालुक्यात १५० गावांचा समावेश आहे. मागील महिन्यापासून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडित होण्याचे सत्र सुरू आहे. वादळ व पाऊस आल्याचे कारण वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सांगत आहेत.

त्यानंतरही वादळ व पाऊस पडला नाही तरी मागील पंधरा दिवसांपासून कायम वीज खंडित केली जात आहे. शहरातील व गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा सातत्याने कमी जास्त होत आहे.

वीजतारांचे आयुष्य संपले?वीज वाहून नेणाऱ्या तारा या खूप जुन्या असल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो, असे सांगण्यात येते. खांबावरील इन्सुलिटर्स हे जुने झाले आहेत. उच्च दाबामुळे ते इन्सुलिटर्स फुटतात काही. इन्सुलिटर्स क्रॅक होतात. त्यामुळेही वीज पुरवठा खंडित होत असतो. विजेचा दाब वाढल्यानंतर वीजपुरवठा ऑटोमॅटिक बंद होतो. वादळवारा आला असेल तर खबरदारी म्हणून वीज पुरवठा बंद केला जातो. वीज वितरण कंपनीने येथे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

देव्हाडी फीडरवरून गावांना वीजपुरवठादेव्हाडी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे रेल्वे स्थानक आहे. मोहाडी फीडरवरील असलेल्या गावांना परसवाडा, पांजरा, मांढळ, स्टेशन टोली या गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे विजेचा लोड वाढत असल्याने देव्हाडी व परिसरातवीजपुरवठा खंडित होत आहे. मोहाडी येथून यापूर्वी या गावांना वीज पुरवठा केला जात होता. वीजपुरवठा करणाऱ्या वीजतारा या कमकुवत असल्याने त्यांना देव्हाडी फीडर येथे जोडण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने उष्णतेपासून लहान मुले व वृद्धांना त्रास होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराelectricityवीजtumsar-acतुमसर