शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्य मार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपूर्वी भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:37 IST

जिल्हयातील राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबर पूर्वी भरण्यात यावे तसेच रस्त्याचे बांधकाम स्वत:च्या घराचे बांधकाम समजून करावे,.....

ठळक मुद्देचंद्रकात पाटील यांचे निर्देश : बांधकाम विभागाची आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हयातील राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबर पूर्वी भरण्यात यावे तसेच रस्त्याचे बांधकाम स्वत:च्या घराचे बांधकाम समजून करावे, असे निर्देश राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.रविवारी भंडारा बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे, तहसिलदार संजय पवार, कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत यावेळी उपस्थित होते.जिल्हयातील रस्त्याचे खड्डे १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण भरावे असे सांगून चंद्रकात पाटील म्हणाले की, १५ डिसेंबर नंतर आपण राज्यातील प्रतयेक जिल्हयात दौरा करुन कामाची पाहणी करणार आहोत. राज्यातील रस्ते व पूल बांधकामाबाबत प्रत्येक जिल्हयाचा समन्वय ठेवण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र सेल उभारण्यात आला आहे. या सेल मार्फत जिल्हयातील कामांचा दररोज आढावा घेण्यात येईल. खड्डे बुजविणे व रस्ते बांधकाम यात जे अधिकारी चांगले काम करतील अशा सर्व अधिकाऱ्यांचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. आपण ज्या तन्मयतेने स्वत:च्या घराचे बांधकाम करतो. तितक्याच तन्मयतेने रस्त्याचे बांधकाम करावे, असे ते म्हणाले.अ‍ॅन्युटीचे काम यशस्वी न केल्यास राज्यातील रस्ते सुरळीत होणार नाहीत, असे ते म्हणाले. अ‍ॅन्युटीसाठी राज्यात किडार पध्दतीचा अवलंब केल्याचे पाटील म्हणाले. राज्यात २२ हजार किलोमिटर राष्ट्रीय महामार्ग चौपदरी व १० हजार किलोमिटर राज्यमार्ग तीन पदरी असे एकूण ३२ हजार किलोमिटरचे रस्ते सुंदर करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. जे रस्ते खड्डे भरण्याच्या पलीकडे नादुरुस्त असतील अशा रस्त्याच्या नव्याने सुदृढीकरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. यावेळी उपस्थित अभियंत्यांनी आपआपल्या भागातील रस्ते व त्यासंबंधीची माहिती मंत्रीमहोदयांना सादर केली.या बैठकीत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कौटूंबिक संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाºयांच्या समस्या व प्रश्न आस्थेने समजावून घेतले. काम करतेवेळी कुठलाही ताण न घेता खेळीमेळीच्या वातावरणात काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वत:साठी दररोज किमान एक तास वेळ काढा, सामाजिक कार्यात सहभागी व्हा, कौटुंबिक संवाद वाढवा व आपली कार्यक्षमता वाढवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी अधिकाºयांना दिला. मंत्रालयात पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करत जा, काही अडचण असल्यास आपल्याशी मोकळा संवाद साधा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.या बैठकीत कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत यांनी जिल्हयातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.