शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

लेखा विभागाचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: March 23, 2017 00:23 IST

विविध मागण्यांसाठी लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले होते.

पंकजा मुंडे यांची मध्यस्थी : मंत्रालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाभंडारा : विविध मागण्यांसाठी लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले होते. आज मंत्रालयात ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. या आंदोलनात राज्यातील सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले होते. यात जिल्हा परिषदमधील ४६ तर पंचायत समितीस्तरावरील २५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जिल्हा परिषदेत विविध विभागात लेखा कर्मचारी कार्यरत आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी लेखा कर्मचारी मागील २७ वर्षांपासून शासनाची लढत आहे. मात्र, शासनाने जाणीवर्पूक याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागण्यांसंदर्भात संघटनेने न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने संघटनेच्या बाजूने निकाल दिलेला असतानाही मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी विरोधी धोरणाबाबत लेखा कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात येण्यासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी हे आंदोलन पुकारले होते. यात पहिला टप्पा १० ते १४ मार्च दरम्यान काळ्याफिती लावून तर १५ मार्चपासून बेमुदत लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. आज मंत्रालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन व रोजगार हमी राज्यमंत्री जयकुमार रावत, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधाकर पोगळे, आमदार विकास कुंभारे यांच्यासह विभागाचे सचिव उपस्थित होते. यात संघटनेच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर संघटनेने लेखनी बंद आंदोलन मागे घेतले. यावेळी संघटनेचे राज्यअध्यक्ष विजयसिंग सुर्यवंशी, राज्यसचिव सुदाम पांगुळ, उपाध्यक्ष सुरेंद्र मदनकर, आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)