शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

पोलिंग पार्टी रवाना; आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:22 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारला मतदान होणार असून मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक संबंधित विधानसभा मुख्यालयातून (पोलींग पार्टी) रविवारला रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० पर्यंत मतदान, निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी१७.५९ लाख मतदार २,१४९ मतदान केंद्र ११,७९० कर्मचारी ३,८३३ पोलीस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारला मतदान होणार असून मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक संबंधित विधानसभा मुख्यालयातून (पोलींग पार्टी) रविवारला रवाना करण्यात आले. ही मतदान प्रक्रिया सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहील. मतदान प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भंडारा विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण महिरे यांनी मतदान साहित्य देऊन रवाना केले. यावेळी तहसिलदार संजय पवार उपस्थित होते. तुमसर येथून स्मीता पाटील यांनी, साकोली येथून अर्चना मोरे यांनी, अर्जुनी मोरगाव येथून शिल्पा सोनाले यांनी, गोंदिया येथून अनंत वळसकर यांनी तर तिरोडा येथून जी.एन. तळपदे यांनी मतदान साहित्य देऊन पोलींग पार्टीला रवाना केले. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० पर्यंत आहे.सोमवारला होणाºया मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २,१४९ मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ४,७२८ बॅलेट युनिट, २,३६६ कंट्रोल युनिट व २,७२४ व्हीव्हीपॅट वापरले जाणार असून या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहे.या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्ह्यात १,२१० मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी असे ६,६५५ अधिकारी कर्मचारी, १,९०९ पोलीस कर्मचारी, पोलिसांच्या पाच तुकडया, अतिरिक्त पोलीस बल नेमण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ९३९ मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे ५,१३५ अधिकारी कर्मचारी, १,९२४ पोलीस कर्मचारी व १४ अतिरिक्त पोलीस दल तुकडया नेमण्यात आले आहे. या सोबतच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील २,१४९ मतदान केंद्रावर अनुक्रमे १४० व १०३ असे २४३ सेक्टर अधिकारी नियुक्त आहे. मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे, भंडाराचे पोलीस अधीक्षक विनीता साहू व गोंदियाचे अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी केले आहे.एका ईव्हीएममध्ये दोन बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटया पोटनिवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे एका ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटसोबत दोन बॅलेट युनिट असणार आहेत. यानुसार लोकसभा मतदारसंघातील एकूण २,१४९ मतदान केंद्रावर ४,७२८ बॅलेट युनिट व २,३६६ कंट्रोल युनिट आणि २,७२४ व्हीव्हीपॅट लावण्यात आले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात १,२१० मतदान केंद्रांवर २,६६१ बॅलेट युनिट व १,३३३ कंट्रोल युनिट आणि १,५९७ व्हीव्हीपॅट तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी, तिरोडा, गोंदिया या तीन विधानसभा क्षेत्रात एकूण ९३९ मतदान केंद्रांवर २,०६७ बॅलेट युनिट व १,०३३ कंट्रोल युनिट आणि १,१२७ व्हीव्हीपॅट लावण्यात आले आहे. यादरम्यान ईव्हीएममध्ये काही तांत्रिक त्रुट्या आल्यास दोन्ही जिल्ह्यासाठी अतिरिक्त कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आले आहे.१८ उमेदवार रिंगणातभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), हेमंतकुमार पटले (भाजप) अक्षय पांडे (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) डॉ.चंद्रमणी कांबळे (डॉ.आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), धर्मराज भलावी (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये (बळीराजा पार्टी), राजेश बोरकर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अ‍ॅड.लटारी मडावी (भारीप बहुजन महासंघ), अजाबलाल तुलाराम (अपक्ष), किशोर पंचभाई (ट्रॅक्टर) काशिराम गजबे (अपक्ष), चनिराम मेश्राम (अपक्ष), पुरूषोत्तम कांबळे (अपक्ष), राकेश टेंभरे (अपक्ष), रामविलास मस्करे (अपक्ष), सुहास फुंडे (अपक्ष) असे १८ उमेदवार रिंगणात आहेत.